शेतकरी कर्जमाफीनंतर श्रेयासाठी चढाओढ, पुणतांब्यातही २ गट

शेतक-यांच्या संपानं देशाच्या राजकीय नकाशावर पुणतांब्याचं नावं उदयाला आलं. ज्या संपानं राज्यातल्या 80 लाख शेतक-यांना फायदा झाला. त्याच संपावरून गावात आता श्रेयाची लढाई सुरू झाली आहे.

Updated: Jun 13, 2017, 09:30 AM IST
शेतकरी कर्जमाफीनंतर श्रेयासाठी चढाओढ, पुणतांब्यातही २ गट title=

प्रशांत शर्मा, पुणतांबे : शेतक-यांच्या संपानं देशाच्या राजकीय नकाशावर पुणतांब्याचं नावं उदयाला आलं. ज्या संपानं राज्यातल्या 80 लाख शेतक-यांना फायदा झाला. त्याच संपावरून गावात आता श्रेयाची लढाई सुरू झाली आहे.

ज्या पुणतांब्याचं नाव शेतकऱ्यांच्या संपानं साऱ्या देशात पसरलं. त्या पुणतांब्यात सध्या जल्लोष सुरू आहे. पण गावच्या जल्लोषाला श्रेयाच्या लढाईची दुर्गंधी येऊ लागली आहे. पुणतांब्यात दोन गट पडले असून सोमवारी गावातली दरी जगासमोर उघड झाली. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेनंतर तीन तारखेला संप मागे घेण्याची घोषणा करणा-या कोअर कमिटीमध्ये पुणतांब्याचे धनंजय जाधव होते. जाधवांवर 3 तारेखनंतर खूप टीका झाली. त्यानंतर जाधव १० दिवस गावात परतलेच नाहीत. सोमवारी सकाळी गावी परतलेल्या धनंजय जाधवांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

आंदोलनच्या सुरूवातीला धनंजय जाधव, धनंजय धनवटे, आणि धंजय धोर्डे असे तीन धनंजय संपाचं नेतृत्व करत होते.पण धनंजय जाधवांच्या मिरवणूकीशी स्पर्धा करण्यासाठी सकाळी धनवटेंनी विजयची गुढी उभारून वेगळी मिरवणूक काढली. त्यामुळे यशाचे मानकरी होण्यासाठी सगळ्यांचीच धावाधाव सुरू झाल्याचं गावात स्पष्ट दिसत होतं.

दरम्यान संपाच्या यशाचं श्रेय साऱ्या गावाचं आहे असं गावकरी मानतात. एकूणच काय संप, आंदोलन आणि त्यातून साधलेली कर्जमाफी यापेक्षाही त्यातलं राजकारण आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत चांगलचं रंगायला लागलंय हेच खरं.