मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पावसाच्या आगमनाकडे लागलं होतं. आज अखेर हवामान खात्याने येत्या 2 दिवसात महाराष्ट्रात पावसाचं आगमन होणार असल्याची माहिती दिली आहे. या माहितीमुळे शेतकऱ्यांना पेरण्यांचे नियोजन करता येणार आहे.
पुणे वेधशाळेचे प्रमुखे के एस होसळीकर यांनी माहिती दिली की, पुढील ४८ तासांत,मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गोवा,दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग,कर्नाटक आणखी काही भाग, TN चा उरलेला भाग,दक्षिण AP चा काही भाग,WC & NW BoB च्या आणखी काही भागात मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल.
त्यापुढील 2 दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सूनसाठी अनुकूल असेल
पुढील ४८ तासांत,मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गोवा,दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग,कर्नाटक आणखी काही भाग, TN चा उरलेला भाग,दक्षिण AP चा काही भाग,WC & NW BoB च्या आणखी काही भागात मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल.
त्यापुढील 2 दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सूनसाठी अनुकूल— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 9, 2022