नाशिक : शेतकऱ्यांना पाच-सहा दिवसात कर्जमाफी मिळेल असा दावा करण्यात आला होता. पण बारा दिवस उलटले तरीही शेतक-यांच्या पदरात पैसे पडलेले नाहीत.
दिवाळीच्या मुहूर्तावर शेतक-यांना कर्जमाफी देण्याचा कार्यक्रम नाशिकमध्येही पार पडला. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ३० शेतक-यांना प्रातिनिधिक स्वरुपात कर्जमाफी देण्याचे सरकारी सोपस्कार पार पडले.
कर्जमाफीसाठी शासन स्तरावरून जिल्हा बँकेला ८७९ पात्र लाभार्थ्यांची यादी पाठविण्यात आली. मात्र त्या यादीत भरमसाठ चुका असल्याचं जिल्हा बँकेच्या निदर्शनास आले. एकाच कुटुंबातील पती पत्नी दोघांनाही कर्जमाफी देण्यात आली.
त्या कर्जाची रक्कम १ लाख ८९ हजार रुपयापर्यंत जात असल्यानं सरकरी नियमांचं उल्लंघन झालंय. दीड लाखापेक्षा जास्त कर्जमाफी दिल्याचं निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हा बँकेनं ८७९ शेतक-यांची यादी पुन्हा दुरुस्तीसाठी सरकारकडं पाठवून दिली आहे.