शिंदे-फडणवीस सरकारकडून निर्णयांचा सुपरफास्ट धडाका; प्रशासकीय कारभार सुसाट

राज्यात नवनिर्वाचित शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नसला तरी प्रशासकीय पातळीवर राज्याचा कार्यभार जोरात सुरू आहे

Updated: Jul 26, 2022, 08:07 AM IST
शिंदे-फडणवीस सरकारकडून निर्णयांचा सुपरफास्ट धडाका; प्रशासकीय कारभार सुसाट title=

मुंबई : राज्यात नवनिर्वाचित शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नसला तरी प्रशासकीय पातळीवर राज्याचा कार्यभार जोरात सुरू आहे. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारच्या शपथविधीच्या पहिल्या 24 दिवसांतच तब्बल 538  जीआर काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मंत्रिमंडळ अस्तित्वात नसल्यानं ते प्रशासकीय पातळीवरच काढले गेले. हा वेग पाहता दिवसाकाठी 22 तर कार्यालयीन वेळ गृहीत धरली तर प्रत्येक तासाला 2.5 जीआर निघालेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सर्व सचिवांची आणि सर्व विभागप्रमुखांची भेट घेणार आहेत. सह्याद्री गेस्ट हाऊसवर ही भेट होणार आहे. 

शिंदे आणि फडणवीस हे गेल्या अनेक दिवसांत मोठा प्रवास करत आहेत. त्यामुळे राज्यातल्या अधिका-यांशी त्यांची भेटच झालेली नाही. आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व विभागाच्या सचिवांशी चर्चा करून कामाचा आढावा घेणार आहेत.