पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीचा 3 वर्षाच्या आदिवासी मुलीवर बलात्कार आणि खून

 3 वर्षांच्या आदिवासी मुलीचा बलात्कार करून खून

Updated: Dec 30, 2020, 01:08 PM IST
पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीचा 3 वर्षाच्या आदिवासी मुलीवर बलात्कार आणि खून title=

पेण : रायगड जिल्ह्यातील पेण इथं 3 वर्षांच्या आदिवासी मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आलीय . पेण इथल्या प्रायव्हेट हायस्कुलच्या मागील बाजूस वडगाव इथं रात्री हा प्रकार घडलाय. तिथंच तिचा मृतदेह आढळून आलाय. 

प्राथमिक चौकशीत तिच्यावर बलात्कार झाल्याचं समोर आलंय. तिचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पेण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलाय. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय.. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून  अलिबाग जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. 

सध्या तो पॅरोलवर बाहेर आहे. या घटनेनंतर आदिवासी समाजात संताप व्यक्त होत आहे.. पेण पोलीस स्टेशन आणि सरकारी रुग्णालयाबाहेर आदिवासी बांधवांनी गर्दी केलीये. 

महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय. दरम्यान कोणतीही अनुचीत घटना घडू नये यासाठी धडक कृती दलाची तुकडी दाखल झालीये.