सामूहिक अत्याचारानंतर हत्या, मृतदेह बॅगेत भरुन तळेगाव स्टेशनवर फेकला, अखेर आता न्याय झाला

Pune Gang Rape And Murder: पुणे सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. 

Updated: May 26, 2023, 03:53 PM IST
सामूहिक अत्याचारानंतर हत्या, मृतदेह बॅगेत भरुन तळेगाव स्टेशनवर फेकला, अखेर आता न्याय झाला title=
Accused in Pune gang atrocity case life imprisonment till death

Pune Gang Rape And Murder: पुणे सामूहिक बलात्कार (Pune Gang Rape) आणि खून खटल्यातील तीन आरोपींना न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश जे जी डोलारे यांच्या खंडपीठाने (Bombay High Court) या प्रकरणात निकाल देताना शिक्षा सुनावली आहे. (pune News)

काय घडलं नेमकं?

नालासोपारा येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केली होती. त्यानंतर तिचा मृतदेह बॅगेत भरुन तळेगाव रेल्वे स्थानकावर टाकला होता. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ माजली होती. तिन्ही आरोपींच्या अटकेनंतर त्यांना फाशी देण्याची मागणी होते होती. मात्र, कोर्टाने आरोपींची जन्मठेप कायम ठेवली आहे. 

वाचाः नवरा-नवरी अमेरिकेत, भटजीबुवा भारतात, असा पार पडला पुण्याच्या सुप्रियाचा विवाह, फी घेतली तब्बल... 

जन्मठेपेची शिक्षा

विशेष सरकारी वकील लीना पाठक यांनी सामुहिक बलात्कार व खून प्रकरणात दोषींच्या फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. मात्र, कोर्टाने याप्रकरणी आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावताना कोर्टाने अपहरण पाच वर्षे, सामूहिक बलात्कार मरेपर्यंत जन्मठेप, खून प्रकरणात जन्मठेप, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी २ वर्षे अशी शिक्षा सुनावली आहे. तर, प्रत्येकी २५ हजारांचा दंड सुनावला आहे. तर या खटल्यात विशेष सरकारी वकील वामन कोळी यांनी देखील काम पाहिले. 

दरम्यान, या प्रलंबित खटल्याचा निकाल लागल्याने पिडीत तरुणीच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. मुलीला अखेर न्याय मिळाला, अशी भावनाही समाजातून व्यक्त होत आहे. 

वाचाः सेंकड हँड कार विकत घेताय, नुकसान होण्याआधी हा अहवाल एकदा वाचाच

चार वर्षांपासून तरुणी बेपत्ता

दरम्यान, भंडारा जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी एक युवती बेपत्ता झाली आहे. कामाच्या ठिकाणावरुन ती परतलीच नव्हती. त्यावेळी तपास झाला होता पण त्यामधून काही समोर आले नव्हते. या तरुणीची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी तिच्या मारेकऱ्यांना अटकही केली आहे. तरुणीचा खून  करणारे तीन आरोपी पोलीसांच्या जाळ्यात अडकले आहेत. मात्र, अद्यापही त्यांना तिचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळं तिच्या कुटुंबीयांचा पोलिसांवरील दबाव वाढत चालला आहे.  

सातवी मुलगी झाली! आईने लेकीला बेवारस स्थितीत सोडले, सोबत सापडलेली चिठ्ठी वाचून हादराल