Accident News : ध्यानीमनि नसताना घडली विपरीत घटना, 'तिच्या' आसुसलेल्या स्वप्नांवर काळाचा घात

Accident News : कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाच्या आधीच तिची सर्व स्वप्न उद्धवस्त, स्थळ पाहण्यासाठी निघालेल्या तरुणावर काळाचा घात. आयुष्यभराचा जोडीदार होऊ पाहणारा 'तो' तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही.   

Updated: Jan 6, 2023, 12:12 PM IST
Accident News : ध्यानीमनि नसताना घडली विपरीत घटना, 'तिच्या' आसुसलेल्या स्वप्नांवर काळाचा घात title=
Accident in Chandrapur Man dies after a bike truck collision while going to see his bride Maharashtra news

Accident News : एखाद्या तरुणीसाठी तिच्या आयुष्यातील खास क्षणांपैकी एक म्हणजे लग्न होणं. आई-वडील, सगेसोयरे सर्वांना सोडून पतीच्या घरीच यापुढचं आयुष्य व्यतीत करणं सोपं नसतं. त्यामुळं आपला संसार सुखाचा व्हावा अशीच प्रत्येक मुलीची अपेक्षा असते. प्रेम करून केलेलं लग्न असो किंवा कांदेपोह्यांचा कार्यक्रम करत थोरामोठ्यांनी सुचवलेल्या स्थळाशी केलेलं लग्न असो या नात्याची सुरुवात अतिशय महत्त्वाची ठरते. पण, आयुष्य इतकं सोपं असतं तर आणखी काय हवं होतं? 

तुम्ही स्वप्न लाख पाहा, पण नशिबाच्या पुढे कोणाला काहीच मिळणार नाही हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. एका तरुणीनं संसाराचं स्वप्न पाहिलं पण, पहिल्या वळणावरच ते स्वप्न उध्वस्त झालं आहे. कारण, आयुष्यभराचा जोडीदार होऊ पाहणारा 'तो' तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही. (Accident in Chandrapur Man dies after a bike truck collision while going to see his bride Maharashtra news)

'स्थळ' पाहण्यासाठी तो निघाला, पण...  

लग्नाचं वय झालं म्हणून प्रवीण श्रावण मंचलवार या (Chandrapur) चंद्रपूर येथील मुल तालुक्यातील मसाळामध्ये राहणाऱ्या तरुणाला एक स्थळ आलं. मुली पाहायला त्यानं सुरुवात केलीच होती. मूल तालुक्यातीलच एका गावी येण्यासाठी म्हणून तो निघाला. म्हणे लग्नासाठी आलेलं स्थळ पाहण्यासाठी तो निघाला होता. मनोहर दसरु मंचलवार यांना प्रवीनणं सोबत नेलं होतं. पण, नगाळा गावाजवळच त्याच्यावर काळानं घाला घातला. 

मुलीच्या घरी पोहोचण्याआधीच अर्ध्या वाटेवर भरधाव वेगानं येणाऱ्या एका ट्रकनं ही दोघं असणाऱ्या एका दुचाकीला भयंकर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की प्रवीण आणि मनोहर या दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू ओढावला.

हेसुद्धा वाचा : Pune News : आजोबा शाळेतून नातवाला आणायला गेले ते परतलेच नाहीत; भीषण दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू

तिथे मुलीकडचे सर्व तयारी करून वरपक्षाकडील मंडळींची आणि प्रवीणची वाट पाहत होते. उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तरुणीच्या मनात नव्या स्वप्नांमुळं कोलाहल सुरु होता आणि तितक्यातच या साऱ्यावर विरजण पडलं ते प्रवीण आणि मनोहर यांच्या अपघाती निधनाच्या बातमीनं. नियती इतकी क्रूर कशी असू शकते? असाच प्रश्न सध्या मृतांच्या कुटुंबातील मंडळींनी विचारला आहे. दरम्यान, सध्या या प्रकरणाचा पोलीस तपासही करत असल्याचं कळत आहे.