प्रणव पोळेकर, झी मीडिया: बारावीच्या शिक्षणामध्ये कोणत्याच प्रकारचा रस नाही. कारण मला आयटीआयमध्ये (IIT) शिक्षण घ्यायचे आहे. पण घरच्यांना ही गोष्ट सांगू शकत नसल्याने अपहरणाचा बनाव रचल्याची कबुली एका अल्पवयीन मुलानं दिली आहे. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. 9 नोव्हेंबर रोजी खेड पोलीस स्टेशनमध्ये आपल्या सतरा वर्षाच्या पुतण्याचे अपहरण झाल्याची तक्रार देण्यात आली होती. (a young girl fakes her own kidnapping pune news marathi)
दरम्यान ज्यावेळी मुलाशी संपर्क साधण्यात आला त्यावेळी त्याने ''मला चोरांनी पकडून परत जिल्ह्यात नेले आहे. कशीबशी मी माझी सुटका केली. आता एका ठिकाणी मी आश्रयाला थांबलो आहे.'' अशी माहिती दिल्यानंतर या मुलाशी संपर्क तुटला होता. पण पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करत आसपासच्या जिल्ह्यांमध्ये या मुलाचा शोध घेण्यात आला. पण ज्या वेळेला मुलाला ताब्यात घेतलं त्यावेळी मात्र वेगळीच आणि धक्कादायक माहिती समोर आली. बारावीच्या शिक्षणात नसल्याने आपणच स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याची कबुली या मुलांना दिली आहे. केवळ एका रात्रीतच या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले आहे.
पाहा मराठमोळ्या मुलानं कसं कमावलं देशात नाव:
तामिळनाडू येथील कोईमतूरमध्ये झालेल्या मोटार सायकल स्टंट राईडींगमध्ये वेगवेगळ्या तीनही स्पर्धेमध्ये रेकॉर्डकरून बारामतीच्या रोहित शिंदे याने देशात पहिला क्रमांक मिळवून अव्वलस्थान मिळविले आहे. तामिळनाडूमधील कोईमतूर येथील सी.आर.एफ कंपनीने स्टंट वॉरफेर (Stunt Warfere) राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये फ्री स्टाईल स्टंट राईडींग (Freestyle Stunt Riding), ऑफस्टीकल टाईम चॅलेंज (Obstacle Time Challenge) व लास्ट मॅन स्टँडींग (Last Man Standing) या तिन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविले आहे. मोटार सायकल एका चाकावर उचलून जास्तीत जास्त गाडी गोल फिरविण्याची ही स्पर्धा होती. केवळ 8 मिनिट 28 सेकंद एवढ्या कमी वेळात एका चाकावर वरील तिन्ही स्पर्धेत रेकॉर्ड केले आहे. तिन्ही स्पर्धेत एकत्रित रेकॉर्ड करणारा रोहित शिंदे हा स्टंट राईडींगमधील (Stunt Riding) पहिला खेळाडू ठरला आहे.