याला म्हणतात ट्रॅजेडी! पाळली मांजर, निघाला बिबट्या

पुण्यात मांजरीचं पिल्लू समजून बिबट्याच्या बछड्याचा सांभाळ केल्याचं समोर आलं आहे. या मांजराला त्यांनी चुटकी असं नाव देखील ठेवलं होत.

Updated: Nov 12, 2022, 04:45 PM IST
याला म्हणतात ट्रॅजेडी! पाळली मांजर, निघाला बिबट्या title=

अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यात(Pune) एक भयानक ट्रॅजेडी (Tragedy) घडली आहे. एक कुटुंबाने मांजर पाळली होती. मात्र, नंतर हे मांजर(cat) नसून बिबट्या(leopard) असल्याचे उघडकीस आले. हा सर्व प्रकार कसा समोर आला हे देखील फारच इंटरेस्टिंग आहे. या  ट्रॅजेडीची पुण्यात चांगलीच चर्चा रगंली आहे.  

मांजरीचं पिल्लू समजून बिबट्याच्या बछड्याचा सांभाळ केला

पुण्यात मांजरीचं पिल्लू समजून बिबट्याच्या बछड्याचा सांभाळ केल्याचं समोर आलं आहे. या मांजराला त्यांनी चुटकी असं नाव देखील ठेवलं होत.  माजरांची प्रकृती बिघडल्याने त्याची वैद्यकीय तपासणी केल्यावर हा बिबट्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

कुटुंबियांनी बछड्याला मांजरीसारखं दूध, ब्रेड खायला दिल्याने त्याची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे, 'चुटकी'ला वन विभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल केलं होते. त्यावेळी, चुटकी अवघी तीन महिन्यांची होती. तेव्हा तिची प्रकृती अगदी नाजूक होती. तिच्या त्वचेला गंभीर संसर्ग झाला होता, केस गळले होते, हिमोग्लोबिन कमी झालं होतं. 

डॉक्टरांच्या तब्बल पाच महिन्यांच्या उपचारानंतर आणि दुस-या बछड्याच्या रक्तदानामुळे 'चुटकी' ठणठणीत झाली. विशेष म्हणजे, चुटकीला रक्तदान केलेला बछडा मादी आहे, तिचं नाव बुटकी आहे.