Ambernath Chemical Company Blast : अंबरनाथ एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीत स्फोट झाला आहे. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर, चार कामगार जखमी झाले आहेत. स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात वायु गळती झाल्यामुळे स्थानिकांना धोका निर्माण झाला आहे. एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याच्या देखील तक्रारी येत आहेत.
अंबरनाथ पश्चिमेकडील वडोल गाव एमआयडीसी क्षेत्रामध्ये ब्ल्यूजेट हेल्थ केअर लिमिटेड या रासायनिक कारखान्यामध्ये स्फोट झाला आहे. शनिवारी दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान हा भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर कंपनीतून मोठ्या प्रमाणात विषारी वायूची गळती सुरू झाली आहे. या स्फोटात एका कामागाराचा मृत्यू झाला आहे. सूर्यकांत झिमान असे मृत कामगाराचे नाव आहे. इतर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींवर उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या कंपनीत एकूण पाच केमिकल प्लांट आहेत. त्यापैकी दोन नंबरच्या प्लांटमध्ये हा भीषण स्फोट झाला. त्यानंतर या प्लांटमध्ये आग देखील लागली होती. आग क्षणार्धात विझली असली तरी या स्फोटामुळे कंपनीत असलेल्या केमिकल टाक्यांना गळती लागली आहे. कंपनीत असलेला मोठ्या रासायनिक टँक मधून नायट्रिक ऍसिडची गळती सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास जाणवत आहे.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातल्या पाळधी येथे बॅनर काढत असताना विजेच्या तारांचा स्पर्श होऊन विजेता धक्का लागल्याने खाली पडून एका 51 वर्षीय इसमाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून संजय दगा पाटील असे मृत इसमाचे नाव आहे दरम्यान सदर घटनेनंतर संजय पाटील यांना तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. संजय पाटील हे का ग्राफिक्स एजन्सीकडे काम करत होते व एजन्सीचे पाळधी येथे लावलेले बॅनर काढण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली आहे दरम्यान मृतकाच्या कुटुंबीयांनी जिल्हा जिल्हा रुग्णालयात आक्रोश करत टाहो फोडला.