वाघिणीचं मन जिंकण्यासाठी दोन वाघांची जुंपली, युद्धाचा थरार कॅमेऱ्यात कैद

 fight between two tigers : वाघिणीचं मन जिंकण्यासाठी दोन वाघांची जुंपली. काना अभयारण्यातील वाघोबाच्या युद्धाचा थरार कॅमेऱ्यात  कैद झाला आहे.  

Updated: Apr 28, 2022, 12:00 PM IST
वाघिणीचं मन जिंकण्यासाठी दोन वाघांची जुंपली, युद्धाचा थरार कॅमेऱ्यात  कैद  title=

अमर काणे / नागपूर :  fight between two tigers in Mukki Zone of Kanha National Park  : वाघिणीचं मन जिंकण्यासाठी दोन वाघांची जुंपली. काना अभयारण्यातील वाघोबाच्या युद्धाचा थरार कॅमेऱ्यात  कैद झाला आहे.  

 वाघोबांची ही झुंज सुरु आहे वाघिणीचं मन जिंकण्यासाठी. दोन वाघांच्या द्वंद्वाच्या व्हिडिओची खूप चर्चा होतेय. मध्य प्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कच्या मुक्की झोनमध्ये दोन वाघांमध्ये चांगलीच जुंपली.  नीलानाला मेल आणि बोईनदाबारा मेल अशी या दोन वाघांची नावं आहेत.  आपण या लढाईचे एक्सकलुसिव्ह व्हिडिओ पाहू शकतो. (Fierce fight between two tigers in Mukki Zone of Kanha National Park in Madhya Pradesh)

जिलालाईन नावाच्या वाघिणीचं  मन जिंकण्यासाठी आणि तिला मिळवण्यासाटी हे दोन वाघ एकमेकांना भिडले.  या दोघांचं युद्ध सुरु असताना जिलालाईन वाघीण तिथंच फिरत होती.पर्यटकांनी या वाघांच्या द्वांद्वाचा थरार कमेरॅत चित्रीत केला आहे. 

बुधवारी सकाळी कान्हा नॅशनल पार्क मध्ये गेलेल्या पर्यटकांनी हे लढाईचे दृश्य पाहायला मिळाले. वाघांच्या यालढाईबाबत  वन्य जीव प्रेमी विनीत अरोरा यांनी माहिती दिली.