Pune Crime News : सुसंस्कृत शहर अशी पुण्याची ओळख आहे. याच पुणे शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील महात्मा फुले संग्रहालयात अधिकारी महिलेचा विनयभंग झाला आहे. वरिष्ठ व्यवस्थापकानेच हे कृत्य केले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
फक्त एक ''किस'' दे म्हणत महात्मा फुले संग्रहालयात अधिकारी महिलेचा विनयभंग केला. महात्मा फुले वस्तु संग्रहालयामध्ये काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याकडे ''कीस'' मागत तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना 13 डिसेंबर रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास घडली. राजीव विनायक विळेकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 70 वर्षीय विनायक हे डेक्कन येथील प्रभात रोड परिसरात राहतात.
याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी भादवि 354 अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पिडीत महिला महात्मा फुले संग्रहालयात अधिकारी आहे. आरोपी हा वरिष्ठ व्यवस्थापक आहे. विळेकर हे या महिलेच्या टेबलजवळ गेले. त्यांना जवळ ओढून त्यांना '' एक कीस दे'' असे म्हणाले. महिलेने त्यांना असे करण्यास नकार दिला. त्यानंतर देखील त्याने हाच धोशा सुरू ठेवला. त्यानंतर ''तुला प्रॉब्लेम असेल तर आपण दरवाजा लावून घेऊ'' असे म्हणत बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.
देशातील प्रसिद्ध उद्योगपती सज्जन जिंदल यांच्यावर एका डॉक्टर महिलेनं बलात्काराचा आरोप केलाय. वांद्रे कुर्ला संकुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार 30 वर्षीय महिलेनं केलीय. व्यक्तीकडून कुटुंबियांना धोका असल्याचंही महिलेनं तक्रारीत म्हटलंय. या प्रकरणात पोलीस तपास करीत आहेत.
चिपळूणमधील कोकरे गावात मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दहावी मध्ये शिकणाऱ्या एका मुलीवर बलात्कार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून अधिक तपास सावर्डाचे पोलीस करत आहेत. दहावी शिकणाऱ्या या मुलीचा नंबर एका संगमेश्वर तालुक्यातल्या मुलांना मिळवला आणि या मुलीला तो कॉल करून त्रास देऊ लागला. काही दिवसानंतर हा मुलगा मुंबईतून थेट चिपळूण येथे आला मुलीला कॉल करून भेटायला बोलावलं आणि जबरदस्तीने गाडीवर बसून आपल्या मित्राच्या घरी घेऊन गेला याच ठिकाणी मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडून त्याच ठिकाणी राहिली. अडीच तासानंतर मुलगी शुद्धीवर आली. यानंतर तिने आपलं घर घातलं आणि सगळा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर तातडीने वडिलांनी सावर्डा पोलीस स्टेशन गाठलं आणि संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. सावर्डा पोलिसांनी देखील तातडीने पहिल्यांदा एका आरोपीला अटक केली. त्यानंतर दुसरे आरोपीला देखील हातात ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या संबंधित पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सध्या दोन्ही आरोपी हे सावर्डा पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहेत.