हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता

 सप्टेंबर मध्ये पॉझिटिव्हीटी रेट सर्वाधिक

Updated: Nov 2, 2020, 04:10 PM IST
हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता  title=

अरुण मेेहेत्रे, झी मीडिया, पुणे :  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.९२% एवढे झाले आहे. तर मृत्यू दर २.६१% इतका आहे. ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्येत ३० टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यात कोरोनाची पहिली लाट ओसरते आहे. मात्र हिवाळ्यात दुसरी लाट येण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे.

हिवाळ्यातील ही दुसरी लाट पाहिल्याइतकी तीव्र नसेल असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत. जगात अनेक देशांत दुसऱ्या तसेच तिसऱ्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सद्य तसेच संभाव्य परिस्थिविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न आमचे प्रतिनिधी अरुण मेहेत्रे यांनी केली आहे. 

डॉ प्रदीप आवटे ( राज्य सर्वेक्षण अधिकारी ) यांनी दिलेली माहिती

- सप्टेंबर मध्ये पॉझिटिव्हीटी रेट सर्वाधिक होता. त्यावेळी दिवसाला २० हजारांवर रुग्ण राज्यात आढळले. 

- मात्र ऑक्टोबर महिन्यात रुग्णसंख्येत ३०टक्क्यांनी घट झाली.

- आज दिवसाला ५ हजारपेक्षा कमी रुग्ण संख्या पाहायला मिळत आहे.

- रुग्ण संख्या वाढीचा दार 10 टक्क्यांच्या खाली

- थंडीच्या दिवसांत दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. 

- दुसऱ्या लाटेचा प्रतिकार करण्यास यंत्रणा सक्षम असल्याची माहिती देखील डॉ. आवटे यांनी दिली आहे.