मुलींची छेड काढणाऱ्याला जन्माची अद्दल घडवली, भर रस्त्यात धु धु धुतलं

एका तरूणानं महिलेची छेड (Young girl eve teasing) काढल्यानं त्याला आसपासच्या मंडळींनी जबर मारहाण केली आहे. या अज्ञात इसमाला कपडे काढून लाथाबुक्क्यांनी मारहाणे केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या बातमीनं सगळीकडे खळबळ माजवली आहे. 

Updated: Nov 19, 2022, 10:32 PM IST
मुलींची छेड काढणाऱ्याला जन्माची अद्दल घडवली, भर रस्त्यात धु धु धुतलं title=

Nasik Crime News: हल्ली तरूणांमध्ये हिंसाचार (Youngters and crime) वाढलेला दिसतो आहे. त्यामुळे सगळीकडेच चिंतेचं वातावरण दिसते आहे. हल्ली मुलींची छेडछाडीचे (Eve Teasing) प्रमाणही वाढू लागले आहे. अशा घटनांमुळे सगळीकडेच चितेंचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या असाच एक प्रकार नाशिकमध्ये (Nashik) घडला आहे. एका तरूणानं महिलेची छेड (Young girl eve teasing) काढल्यानं त्याला आसपासच्या मंडळींनी जबर मारहाण केली आहे. या अज्ञात इसमाला कपडे काढून लाथाबुक्क्यांनी मारहाणे केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या बातमीनं सगळीकडे खळबळ माजवली आहे. सध्या या प्रकारानं सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे. हा प्रकार सगळीकडे गंभीरपणे घेतला जात आहे. (a man who molested young girl was badly beaten up by a mob near nashik)

नाशिकच्या (Nashik Crime News) पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन हॉटेल जवळ मुलीची छेडछाड करणाऱ्या युवकाला (Man) जमावाने बेदम मारहाण केली काल दुपारच्या दरम्यान ही घटना घडलीये. शाळा  सुटल्यानंतर आपल्या घरी जाणाऱ्या शाळकरी मुलींना पाथर्डी फाटा  येथील एक्सप्रेस इन हॉटेल जवळ रस्त्याला लागून असलेल्या ठिकाणी एका टवाळखोर युवकाने रस्त्यात मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न केला. दोघी मुली घाबरल्या घाबरलेल्या अवस्थेत एक मुलीने (Girl scared) आपले घर घाठले व आई वडिलांना सविस्तर माहिती सांगितली. 

हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद

मुलीचे आई-वडील लगेच घटनास्थळी पोहोचले त्या ठिकाणी छेड काढत असलेल्या युवकाला त्यांनी चोप दिला या ठिकाणी इतर नागरिक ही जमा झाले त्यांनीही या मद्यसेवन केलेल्या टवाळखोळ युवकाला अंगावरील कपडे फाटेपर्यंत चोप दिला. घटनेची माहिती समजतात इंदिरानगर पोलीस (Police) स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले जखमी झालेल्या या युवकाला जिल्हा शासकीय रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले आहे. इंदिरानगर पोलीस स्टेशन ला संपर्क साधला असता युवक हा मद्य (Drunk) सेवन केलेल्या अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले.  

हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....

त्यानं दारू पिऊन गाडी सरळ... 

नाशिकमध्ये गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एका मद्यधुंद कार चालकाने चार ते पाच जणांना उडवल्याची घटना घडली होती या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आलाय. सीसीटीव्ही मध्ये हे कार वाहनांना धडक देत असल्याचे दिसतंय. तसच पोलीस त्या वाहन चालकाला पकडण्याचे प्रयत्न करताना दिसताय. नाशिक-पुणे महामार्गावर (Highway) असलेल्या उपनगर वरून लेखानगर आणि त्यानंतर लेखानगर कडून मुंबई नाक्याकडे भरधाव वेगाने येत असताना या कार ने चार ते पाच जणांना धडक दिली होती. साहेबराव निकम अस त्या मद्यधुंद कारचालकाच नाव आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर जिखा शासकीय रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू असून त्यांचा अजून जबाब घेण्यात आलेला नाही. ही घटना नाशिकमधील मुंबई नाका आणि अंबड या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कार (Car) चालकास ताब्यात घेतल होत. या घटनेतील एका गंभीर जखमी व्यक्तीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर इतर दोघांना खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.