बीड : बीड जिल्ह्यातील रायमोहा येथील परीक्षा केंद्रावर खाली बसून पेपर सोडवण्याच्या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने परीक्षा केंद्राला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. विद्यार्थ्यांना खाली बसवून अशा पद्धतीने परीक्षा द्यायला लावू नये हा त्यांना त्रास देण्याचा प्रकार आहे आणि त्यामुळे या पद्धतीचा दंड लावण्यात आलेला आहे.
कोणतीही व्यक्ती ४० मिनिटे ते एक तासभर जमिनीवर बसू शकते आणि उत्तरे लिहू शकते. मात्र या विद्यार्थ्यांनी खाली बसून पेपर सोडवला, नक्की किती प्रश्न त्यांनी खाली बसून सोडवले याबाबतचा खुलासा ही खंडपीठाने मागवलेला आहे. याबाबत बोर्डालादेखील नोटीस देऊन खुलासा करण्याबाबत सांगितलं आहे.
हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर कोर्टाने या प्रकरणात सू-मोटो याचिका दाखल करून घेतली आहे. १२वी इंग्रजीचा पेपर या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना खाली बसून सोडवावा लागला होता. त्यानंतर या प्रकारावर मोठी टीका करण्यात आली होती.
बीड तालुक्यातल्या रायमोहामध्ये अतुल कला आणि वाणिज्य महाविद्यालयांत बारावीच्या विद्यार्थ्यांना चक्क जमिनीवर बसून द्यावी लागली. परीक्षा केंद्रावर इतर भौतिक सुविधा उपलब्ध नव्हत्या. शिवाय विद्यार्थ्यांना जमिनीवरती धुळीत बसून परीक्षा द्यावी लागली. त्यामुळे बीड जिल्ह्यातील परीक्षा विभागाकडून परीक्षा घेण्यासाठी पूर्वतयारी का केली नाही आसा प्रश्न निर्माण होत आहे.