Nylone Kite : सध्या लवकरच मकरसंक्रांतीचा (Makarsankranti) सण सुरू होणार आहे. त्यामुळे बाजारात सगळीकडेच पतंग आणि मांज्या विकत घेण्याची एकच झुंबड लागलेली आपल्याला पाहायला मिळायला सुरूवात झाली असेलच. त्यातून अनेकदा पतंग खेळताना मांज्याचा वापर जपून करा किंवा कमी करा याबद्दल कायमच जागरूकता निर्माण करण्याची सगळेच प्रयत्न करत असतात. परंतु काहीही झालं तर दरवर्षी मांज्यामुळे कुणाला तरी जखम झाल्याची घटना आपल्या कानावर येतेच येते. कधी पक्ष्यांना (Harmful nylone) तर कधी प्राण्यांना आणि माणसांनाही यामुळे अनेकदा त्रास झाला आहे तर अनेकांचा जीवही धोक्यातही आला आहे. काहींना तर जीवही गमावावा लागला आहे. परंतु अद्यापही त्यांची योग्य तो परीनं काळजी घेतली जात नाही असेच दिसते आहे. सध्या या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होण्याची शक्यता असते.
असाच एक प्रकार हा फारूखनगर परिसरात घडला आहे. शुक्रवारी संध्याकाळी एका 7 वर्षांच्या मुलीला पतंगाचा मांजा लागल्यानं तिच्या मानेला 26 टाके लागले आहेत. त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली आहे. समोर आलेल्या माहितीनूसार, या लहानमुलीचे वय 5-7 एवढे होते त्यामुळे तिच्या वडिलांनी पतंगानं (Kite) खेळणाऱ्या लोकांना आवाहन केले आहे की, तुम्ही पतंग खेळताना जबाबदारीनं खेळा अन्यथा लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. कारण या मुलीच्या गळ्याला जखम झाल्यामुळे तिच्या मेंदूला होणारा रक्तपुरवठाही थांबला होता. परंतु तिचा जीव हा थोडक्यात बचावला आहे.
समोर आलेल्या महितीतून असेही कळते की, अशाप्रकारे मानेला मांज्यामुळे दुखापत होणे हे फार धोक्याचे लक्षण आहे कारण त्यानं तुमच्या मेंंदूलाही (Blood Circulation To Brain) रक्तपुरवठा होऊ शकत नाही. अशानं तुमचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे आपला आणि आपल्या आत्पजनांची काळजी घ्या.
हेही वाचा - Divita Rai: लठ्ठपणा, अनियमित मासिक पाळीवर मात; जाणून घ्या, Divita Rai चा Miss Universe पर्यंतचा प्रवास...
पोलिसांनी घडल्या प्रकारावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सगळ्यांनीच आता योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक ठरलं आहे. सण सभारंभा आरामात, मजेत साजरे करा परंतु पतंग खेळ्यानंतर आपला पसारा आवरा, कुठे तो धागा दिसला तर वेळीच तो दूर करा आणि योग्य ती काळजी घ्या जेणेकरून याचा धोका इतर कोणालाही होणार नाही. सध्या अशाप्रकारे जागरूकता (Awareness) निर्माण करणं अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. अनेक शहरात आणि छोट्याशा गावात असे प्रकार घडताना दिसतात. त्यामुळे पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या आणि स्वत:च्या सुरक्षिततेसाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक ठरले आहे.