दियाची राजकीय वादातून हत्या?, माणगाव बंदचं आवाहन

 वावे गावातील अपहरण झालेल्‍या दिया जाईलकर या ८ वर्षीय मुलीची हत्‍या झाली असल्‍याची धक्‍कादायकबाब समोर आली आहे. 

Updated: May 29, 2018, 11:56 AM IST
दियाची राजकीय वादातून हत्या?, माणगाव बंदचं आवाहन  title=

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील  माणगाव तालुक्‍यातील वावे गावातील अपहरण झालेल्‍या  दिया जाईलकर या ८ वर्षीय मुलीची हत्‍या झाली असल्‍याची धक्‍कादायकबाब समोर आली आहे. या हत्येच्या निषेधार्ध आज माणगाव तालुक्यात बंदचं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान, ही हत्या राजकीय वादातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गोरेगाव, माणगाव, निजामपूर आणि लोणेरे गावातल्या बाजारपेठा आज बंद राहणार आहेत. दियाचा मृतदेह तिच्‍या घरापासून जवळच असलेल्‍या एका बंद घरात तिचा मृतदेह आढळून आला आहे . २५ मे रोजी सायंकाळपासून दिया बेपत्‍ता होती . गावातील दुकानात खाऊ आणण्‍यासाठी गेलेली दिया परतलीच नाही . तिच्‍या नातेवाईकांनी शोध घेवून ती सापडली नाही. त्‍यामुळे माणगाव पोलीस ठाण्‍यात  अपहरणाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. 

२५ मे रोजीच गावात झालेल्या निवडणुकीत दियाची आई बिनविरोध निवडून आली. त्याच वादातून दियाचं अपहरण आणि हत्या झाल्याचा संशय आता व्यक्त होत आहे.  या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून गावात कडेकोट पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे. वरिष्‍ठ पोलीस अधिकारी घटनास्‍थळी पोहोचले आहेत. दियाचा मृतदेह माणगाव सरकारी रूग्‍णालयात आणण्‍यात आला तेव्‍हा तेथे ग्रामस्‍थांनी मोठी गर्दी केली होती . रात्री उशिरा दिया मृतदेह उत्‍तरीय तपासणीसाठी मुंबईत नेण्‍यात आला आहे.