Maharashtra Corona | राज्यात कोरोनामुक्तांपेक्षा कोरोना बाधित अधिक, सर्वाधिक पॉझिटिव्ह कुठे?

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत चढ उतार कायम आहे. 

Updated: Jul 15, 2021, 08:41 PM IST
Maharashtra Corona | राज्यात कोरोनामुक्तांपेक्षा कोरोना बाधित अधिक, सर्वाधिक पॉझिटिव्ह कुठे?  title=

मुंबई : राज्याचा दररोजचा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा आला आहे. राज्यात काही दिवसांपासून कोरोना मुक्तांपेक्षा कोरोना बाधितांची अधिक नोंद होत आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये एकूण 8 हजार 10  नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर दिवसभरात 8 हजारपेक्षा कमी रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. (8 thousand 10 new corona positive patients have been reported in Maharashtra 15 july 2021)

एकूण 7 हजार 391 जणांनी दिवसभरात कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे या कोरोना मुक्त झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण 59 लाख 52 हजार 192 जण कोरोनामुक्त झाले आहेत. परिणामी राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा 96.17% इतका झालाय. 
 
दिवसभरात कोरोनामुळे 170 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यू दर हा 2.04 इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,48,24,211 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,89,257 (13.81 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,81,266 व्यक्ती होम क्वारंटाईनआहेत तर 4,471 व्यक्ती संस्थातमक विलिगिकरणात आहेत. राज्यात सध्या एकूण 1 लाख 7 हजार 205 सक्रीय रुग्ण आहेत. 

मुंबईतील आकडेवारी

मुंबईत आज 545 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर 505 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील आतापर्यंत एकूण  704764 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा 96% टक्के इतका आहे. तर मुंबईत सध्या 7 हजार 12 सक्रीय रुग्ण आहेत.