जलपरीप्रमाणे जाळ्यात अडकला साप... गावकऱ्यांची त्रेधातिरपिट; video झालाय तूफान viral

हल्ली अजगर (python) सापडण्याचे प्रकार सगळीकडेच पाहायला मिळत आहेत. सध्या अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त आणि भयभीत झालेले आहेत. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे. 

Updated: Nov 10, 2022, 12:43 PM IST
जलपरीप्रमाणे जाळ्यात अडकला साप... गावकऱ्यांची त्रेधातिरपिट; video झालाय तूफान viral  title=
Python stucks in the net

प्रवीण दांडेकर, झी मीडिया, भंडारा: आजकाल सापाचे अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. त्यातून महाराष्ट्रातही (Snakes in Maharashtra) असे अनेक व्हिडीओ तयार केले जातात आणि व्हायरल होतात. सोशल मीडियावर अशा व्हिडीओजना खूप पसंती मिळते. सर्पमित्र अनेकदा एकत्र जमतात आणि सामान्यांसाठी सापांबद्दल कायमच चांगली माहिती देत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ (Video) पाहून तुम्हाला परत माणूस आणि प्राण्याच्या (Maharashtra News) नात्याबद्दल पुन्हा एकदा विश्वास बसेल. (8 feet 10 inches long python caught in fisherman's net python snake found in lake in sipewada)

हल्ली अजगर सापडण्याचे प्रकार सगळीकडेच पाहायला मिळत आहेत. सध्या अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त आणि भयभीत झालेले आहेत. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे. एका भागात असाच एक अजगर पाहायला मिळतो आहे. मासेमाऱ्याच्या जाळ्यात तब्बल 8 फूट 10 इंच लांबीच्या अजगर अडकल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातिल सिपेवाडा येथील तलावात घडली आहे. तब्बल तास भराच्या रेस्क्यु नंतर अजगर सापाला जीवनदान दिले गेले आहे. यावेळी उपस्थित मासेमारांची भीतिने तारांबळ उडाली होती हे विशेष.अखेर अजगर सापाला त्याच्या निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले आहे.

हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद

नागपूरला जेव्हा 13 फूटांचा अजगर सापडला - 

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील डोंगरी येथे आढळलेल्या 13 फूट अजगराला जीवनदान मिळालंय. वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनाइजेशन सर्पमित्र व प्राणीमित्र या संस्थेच्या सदस्यांनी या 13 फूट लांबीच्या अजगराला त्याच्या अधिवासात सोडले .रामटेक जवळील डोंगरी येथील सुनील नागपुरे शेतात धान कापत असतांना त्यांच्या पायाजवळ एक मोठा अजगर साप आढळून आला. शेतात इतका मोठा साप दिसल्याने शेतात काम करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.  

सापचं तोंड हातात धरून तो...

हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....

नागपूरात एक धक्कादायक प्रकार घडला ज्यावर तुम्हाला विश्वासही बसणार नाही. पण होय एक तरुण चक्क सापाच तोंड हातात पकडून रुग्णालयात उपचारासाठी पोहचला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आणि सगळेच घाबरले. पण थांबा त्या तरुणाला साप चावल्यानं उपचार करताना सोप्पं जावं म्हणून चक्क रसल वायपर (russel viper) घेऊन तो इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज या शासकीय रुग्णालयात  पोहचला. पंकज सपाटे असे 37 वर्षीय तरुणाचे नाव आहे. सध्या त्याचावर उपचार सुरू असून प्रकृती सुधारत असल्याचं सांगितलं जातं आहे. सापाच तोंड हातात पकडून रुग्णवाहिकेतून 10 ते 15 मिनिटाचा प्रवास केला.