कोरोना : पुढील ५ दिवसात रत्नागिरीत सार्वजनिक वाहतूक बंद करणार

कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ 

Updated: Mar 19, 2020, 11:26 AM IST
कोरोना : पुढील ५ दिवसात रत्नागिरीत सार्वजनिक वाहतूक बंद करणार  title=

रत्नागिरी : कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत ही संख्या ४७ वर पोहोचली आहे. रत्नागिरीतही कोरोनाबाधित एक रूग्ण सापडला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषद घेतली. पुढील काही दिवसांत महत्वाच्या घडामोडी रत्नागिरीत घडणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील ५ दिवस रत्नागिरीतील सार्वजनिक वाहतूक हळूहळू बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

दुबईवरून  रत्नागिरीत आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. चार दिवसांत ही व्यक्ती दुबईतून रत्नागिरीत पोहोचली. या व्यक्तीची तब्बेत आता ठणठणीत बरी आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. ही व्यक्ती  गुहागरमधील एका खासगी रुग्णालयात गेला होता त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.  त्याच्यासोबत आलेल्या दोन जणांना देखील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

 गुहागरमध्ये दुबईवरून आलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे रत्नागिरीत पुढील काही दिवसांत महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहे. कोकणात सध्या शिमग्याचा उत्सव आहे. या पण या उत्सावावर देखील आता बंदी आणण्यात आली आहे. गावोगावी देवीची पालखी येते आणि उत्साहात शिमगा साजरा केला जातो. पण आता रत्नागिरी आणि रत्नागिरी नजीकच्या अनेक गावांत पालखी आणण्यास बंदी केली आहे.

  एवढंच नव्हे तर रत्नागिरीतील सर्व मंगल कार्यालये, परमिट रुम, बिअर बार बंद ठेवणार असल्याची माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच सर्वच धार्मिक स्थळ देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जर कोणी ऐकलं नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केले जातील, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.