Pune Nashik Highway Accident : पुणे - नाशिक महामार्गावर भीषण अपघात, 5 महिलांचा मृत्यू

Pune Nashik Accident : पुणे- नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात 5 महिलांचा मृत्यू झाला आहे. ( Accident  News) महामार्गावर खरापुडी फाटा येथे हा भीषण अपघात झाला. 

Updated: Feb 14, 2023, 10:35 AM IST
Pune Nashik Highway Accident : पुणे - नाशिक महामार्गावर भीषण अपघात, 5 महिलांचा मृत्यू title=
Pune Nashik Highway Accident

Pune Nashik Highway Accident : पुणे- नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात 5 महिलांचा मृत्यू झाला आहे. ( Accident  News) महामार्गावर खरापुडी फाटा येथे हा भीषण अपघात झाला. रस्ता ओलांडताना कारन 17 महिलांना जोरदार धडक दिली. यात 7 महिला जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमी महिलांवर खासगी आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ( Pune Nashik Accident )

या महिला  पुणे शहरातून खेड तालुक्यातील शिरोली येथील मंगल कार्यालयात स्वयंपाकासाठी जात होत्या. रात्रीच्या सुमारास या महिला येत होत्या. त्यावेळी पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या लेनवर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.  कारने या महिलांना रस्ता ओलांडताना जोरदार धडक दिली. या अपघातानंतर वाहन चालकाने रस्ता दुभाजक तोडून वाहनासह तेथून पळ काढला. अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

Pune Ahamadnagar Car Accident :  पुणे - अहमदनगर महामार्गावरील शिक्रापूर येथे मध्यरात्री भीषण अपघात झाला असून या अपघातात लक्झरी ऑडी कारने जोरदार धडक दिल्याने मालवाहतूक मॅक्झिमा गाडी मार्गावरच उलटली. या अपघातात मालवाहतूक गाडीतील चालक गंभीररीत्या जखमी झाला. धक्कादयक बाब म्हणजे लक्झरी कार चालक या अपघातानंतर जखमी मँक्जिमा चालकाला घटनास्थळीच सोडून त्या ठिकाणावरून निघून गेला. या प्रकरणी आता शिक्रापूर पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.