रायगड जिल्ह्यात कोरोनाचा कहर; उरणमध्ये एकाच दिवशी सापडले ४४ नवे रुग्ण

गेल्या चार दिवसांत उरणमध्ये कोरोनाचे ९८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. 

Updated: May 13, 2020, 08:41 PM IST
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा कहर; उरणमध्ये एकाच दिवशी सापडले ४४ नवे रुग्ण title=

उरण: राज्यात मुंबई आणि पुणे या शहरांलगत असलेल्या परिसरातही कोरोना व्हायरस (Coronavirus) वेगाने फैलावत असल्याचे दिसत आहे. रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये बुधवारी कोरोनाचे ४५ रुग्ण आढळून आले. उरणसारख्या शहरात एकाच दिवसात कोरोनाचे इतके रुग्ण सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांत उरणमध्ये कोरोनाचे ९८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १०६ वर जाऊन पोहोचला आहे.

अरे देवा! धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा हजाराच्या पार

 

त्यामुळे मुंबई आणि पुण्यासारख्या दाटीवाटीच्या शहरांपुरता मर्यादित असलेला कोरोना आता आजुबाजूच्या परिसरातही वेगाने हातपाय पसरत आहे का, अशी भीती निर्माण झाली आहे. याशिवाय, बुधवारी पनवेल महापालिका परिसरात १० तर पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे सात नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३९८ वर जाऊन पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरांतील अनेक लोक आपापल्या गावी परतत आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

धक्कादायक! राजेश टोपेंच्या बैठकीत कोरोनाबाधित अधिकारी