टेन्शन वाढलं, राज्यात गेल्या ३५ तासांत १२५१ नवे रुग्ण

सध्या राज्यात १,३६,९२६ लोक होम क्वारंटाईन असून ९,१६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. 

Updated: Apr 26, 2020, 08:42 PM IST
टेन्शन वाढलं, राज्यात गेल्या ३५ तासांत १२५१ नवे रुग्ण title=

मुंबई:  राज्यात रविवारी कोरोनाचे ४४० नवे रुग्ण आढळून आले. तर १९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यातील एकूण रुग्णांपैकी २०४ रुग्ण हे मुंबईतील आहेत. वरळीचा भाग येत असलेल्या  जी दक्षिण विभागात आतापर्यंत सर्वाधिक ६०० रूग्ण तर ई विभागात ४६६ रूग्ण आढळून आले आहेत. याशिवाय, मुंबईतील २४ पैकी १७ वॉर्डमध्ये कोरोनाचे १०० पेक्षा अधिक रूग्ण आहेत. त्यामुळे आता मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ५,४०७ इतका झाला आहे.

देशात गेल्या २४ तासांत १९७५ नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या २६ हजारांवर

दरम्यान, काल राज्यात ८११ रुग्ण आढळून आले होते. या तुलनेत आजचा आकडा जवळपास निम्म्याने घटला आहे. आज राज्यातील कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या एकूण ११२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ११८८ इतकी झाली आहे. 

मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईत कोरोनाचे ७० हजार रुग्ण?

सध्या राज्यात १,३६,९२६ लोक होम क्वारंटाईन असून ९,१६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर राज्यभरात ६०४ कंटेन्मेंट झोन आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १,१६,३४५ नमुन्यांपैकी १,०७,५१९ जणांचे नमुने नेगेटिव्ह आढळून आले. तर ८०६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.