गणपती उत्सवासाठी ४०० शिवशाही गाड्या एसटीच्या ताफ्यात

गणपतीसाठी गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक चांगली बातमी आहे. जादा एसटी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  

Updated: May 10, 2019, 06:14 PM IST
गणपती उत्सवासाठी ४०० शिवशाही गाड्या एसटीच्या ताफ्यात title=

मुंबई : गणपतीसाठी गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक चांगली बातमी आहे. कोकण रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाल्याचे वृत्त हाती आले आहे. त्यामुळे आणखी जादा रेल्वे गाड्या सोडण्यात येतील. मात्र, राज्य परिवहन विभागाने जादा एसटी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ४०० नवीन शिवशाही गाड्या आपल्या ताफ्यात वाढवणार आहेत  येत्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने प्रवाशांच्या मदतीसाठी एसटी येणार आहे. कोकणसह राज्यातील गणेशभक्तांना एसटी महामंडळाने दिलासा दिला आहे .  शिवशाही  गाड्यांच्या अनेक तक्रारी येत आहे. यावर मता करण्यासाठी गाड्यांच्या चेसिस आणि इंजिनमध्ये देखील बदल करण्यात येणार आहेत.  

गणपती उत्सवात कोकणसह राज्यभरात मोठ्या संख्येने गणेशभक्त प्रवास करतात. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर ताण येतो. याचा फायदा या काळात अनधिकृत वाहतूक करणारे तसेच खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूटमार केली जाते. हे प्रकार थांबवण्यासाठी एसटीने कंबर कसली आहे. त्यासाठी जादा एसटीच्या फेऱ्या चालवण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. खासगी ट्रॅव्हल्सना टक्कर देण्यासाठी महामंडळ स्वमालकीच्या वातानुकूलित शिवशाही बांधणार आहे.

शिवशाहीच्या ज्या काही तक्रारी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न आहे.  घाट मार्गावर एसी बंद पडणे, दोन आसनांमध्ये जागा कमी असणे, चार्जिक पॉइंट कार्यरत नसणे या आणि अन्य समस्या 'शिवशाही'मध्ये प्रवाशांना भेडसावतात. या तक्रारींबाबत संबंधित कंत्राटदारांना महामंडळाने कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. या तक्रारी सोडवण्यासाठी महामंडळाने ४०० 'शिवशाही'च्या चेसिसमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इंजिनची क्षमता वाढवण्यासाठी २५० अश्वशक्तीचे इंजिन बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 

एसटीच्या ताफ्यात असणाऱ्या गाड्या

-  राज्यातील २००हून अधिक मार्गावर धाव एसटी धावतेय

-  सध्या एसटी ताफ्यात १०३१ शिवशाही 

-  ५०० स्वमालकीच्या तर ५३१ भाडेतत्त्वावरील 

-  १४० शिवशाही गाड्या या सध्या नादुरुस्त अवस्थेत? 

-  ब्रेकडाऊन गाड्या या एसटी आणि खासगी कंत्राटदारांच्या