टरबूज खाल्यानंतर ४० जणांना विषबाधा, आरोग्य यंत्रणेची धावपळ

जास्त त्रास जाणवत असलेल्या रुग्णांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे

Updated: Jun 8, 2019, 10:26 AM IST
टरबूज खाल्यानंतर ४० जणांना विषबाधा, आरोग्य यंत्रणेची धावपळ title=

निलेश वाघ, झी २४ तास, नांदगाव : टरबूज खाल्ल्यानंतर सुमारे ४० ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील वसंतनगर गावात समोर आलीय. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर विषबाधा झाल्याने  आरोग्य यंत्रणेचीही धावपळ उडाली आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये महिला व लहानग्यांचाही समावेश आहे. ग्रामस्थांना अचानक उलटी व जुलाबाचा त्रास जाणवू लागल्याने बहुतेक रुग्णांनी जातेगाव, बोलठाण व नांदगावच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतले.


टरबूज खाल्यानंतर बिषबाधा, नांदगाव

मात्र, सायंकाळी सात वाजल्याच्या सुमारास त्रास जास्त जाणवू लागला. रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने ग्रामस्थांनी बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधला. तेथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने तत्काळ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाने यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. डॉ.ससाणे यांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित परिचारिका, परिचर व आरोग्य सेवक यांना गावात पाठवून रुग्णांवर प्राथमिक उपचार केले. 


रुग्णांना वेळीच मिळाली मदत

जास्त त्रास जाणवत असलेल्या रुग्णांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ग्रामस्थांना जे टरबूज खाल्ल्याने  विषबाधा झाली त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. भागिनाथ चव्‍हाण (५० वर्षे), कविताबाई चव्हाण (३० वर्षे), अश्विनी चव्हाण (१६ वर्षे), रितेश चव्हाण (८ वर्षे), लताबाई चव्हाण (२५ वर्षे), जगदीश चव्हाण (१९ वर्षे), अरविंद चव्हाण (१८ वर्षे), प्रवीण चव्हाण (२० वर्षे), अंकुश चव्हाण (२१ वर्षे), निलाबाई चव्हाण (७० वर्षे), गोरख चव्हाण (४५ वर्षे), नर्मदाबाई चव्हाण (५० वर्षे), गंगुबाई चव्हाण (४० वर्षे), सुमित चव्हाण (६ वर्ष), सुयश चव्हाण (८ वर्ष), समीर राठोड (९ वर्ष), सुरेखा राठोड (२५ वर्षे), पार्वतीबाई चव्हाण (६० वर्षे), रोशन राठोड (९ वर्षे), पूजा राठोड (२२ वर्षे), शांताबाई चव्हाण (५० वर्षे), शंकर चव्हाण (९० वर्षे), समाधान चव्हाण (१० वर्षे), तेजस चव्हाण (आठ महिने), समाधान चव्हाण (१० वर्षे), सुरेखा राठोड (२५ वर्षे), समीर राठोड (९ वर्ष), करिश्मा राठोड (१० वर्षे), सुयश चव्हाण (९ वर्ष), सुमिध चव्हाण (४ वर्ष), पार्वती चव्हाण (४० वर्षे), सुमाबाई चव्हाण (४० वर्षे), अरविंद चव्हाण (१९ वर्षे), उज्ज्वला राठोड (२५ वर्षे), तन्वी राठोड (५ वर्षे), धनश्री राठोड (३ वर्षे) या ग्रामस्थांचा विषबाधा झालेल्यांमध्ये सहभाग आहे.