अकोला शहरातील २२८ टॉवर पैकी २२० मोबाईल टॉवर अनधिकृत

प्रशासनाचा ६ कोटी ६० लाखांचा महसूल बुडाला

Updated: Jan 13, 2020, 06:15 PM IST
अकोला शहरातील २२८ टॉवर पैकी २२० मोबाईल टॉवर अनधिकृत title=

अकोला : शहरातील २२८ टॉवर पैकी २२० मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अकोला शहरात विविध मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी महापालिका क्षेत्रात प्रशासनाची कोणतीही रितसर परवानगी न घेता अनधिकृत टॉवर्सचं जाळं पसरवलं आहे. यामुळे प्रशासनाचा ६ कोटी ६० लाखांचा महसूल बुडाला आहे. दरवर्षी संबंधित मोबाईल टॉवरचे नूतनीकरण करणे अनिवार्य आहे. मात्र मोबाईल कंपन्यांनी ते केले नसल्याचे ही प्रशासनाचे म्हणणे आहे.

अखेर महापालिकेने आता मोबाईल टॉवरवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. तसंच १६ तारखेपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र या कारवाईमुळे शहरातील अनेक भागात मोबाईल सेवा विस्कळीत झाल्याने याचा फटका ग्राहकांना बसतो आहे.
 
याआधी देखील अनेक शहरांमधील अनधिकृत मोबाईल टॉवरचा प्रश्न पुढे आला होता. यामुळे याचा फटका महापालिकेला बसतो आहे. मोबाईल कंपन्या अशा प्रकारे महसूल बुडवत आहेत.