हृदयद्रावक! 12 दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू

12 दिवसांच्या कोरोना पॉसिटिव्ह बाळाचा मृत्यू झाला आहे.

Updated: Jul 4, 2021, 11:10 AM IST
हृदयद्रावक! 12 दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू title=

नागपूर : नागपूरमध्ये एक काळीज पिळवटवून टाकणारी घटना घडली आहे. नागपूरातील सरकारी वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच मेडिकल कॉलेजमध्ये एका 12 दिवसांच्या कोरोना पॉसिटिव्ह बाळाचा मृत्यू झाला आहे. 20 जून रोजी या बाळाचा जन्म झाला होता. या बाळाला जन्मानंतर सहा दिवसांनी ताप आल्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यावेळी बाळाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

दरम्यान 20 जूनला प्रसूतिपूर्वी या चिमुकल्या बाळाच्या आईची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. 2 जुलै रोजी या बाळाचा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या बाळाला इतर काही कॉम्प्लिकेशन देखील होत्या. या बाळाचं हृदय योग्य पद्धतीने कार्यरत नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

महाराष्ट्रात 3 जुलै रोजी एकूण 9 हजार 489 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. तर या 24 तासांमध्ये 8 हजार 395 रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत.  राज्यात आजपर्यंत एकूण 58 लाख 45 हजार 315 कोरोना बाधित बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96 टक्के इतकं झालं आहे.

राज्याच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली असताना मुंबईच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी काहीशी दिलासादायक बातमी आहे. मुंबईत 24 तासांमध्ये 575 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 851 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा  96 टक्के इतका आहे. मुंबईत सध्या  8 हजार 297 सक्रीय रुग्णांवर उपचार केले जात आहे.