गडचिरोलीत माओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचा जवान शहीद

गडचिरोली माओवाद्यांच्या हल्ल्यात एक सीआरपीएफचा जवान शहीद झालाय. तर दोन जवान जखमी झालेत आहेत. धानोरा तालुक्यात ग्यारापत्तीच्या जंगलात ही चकमक झालीय.

Updated: Nov 28, 2017, 08:43 AM IST
गडचिरोलीत माओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचा जवान शहीद title=

गडचिरोली : गडचिरोली माओवाद्यांच्या हल्ल्यात एक सीआरपीएफचा जवान शहीद झालाय. तर दोन जवान जखमी झालेत आहेत. धानोरा तालुक्यात ग्यारापत्तीच्या जंगलात ही चकमक झालीय. पोलीस आणि सीआरपीएफच संयुक्त अभियान सुरु असताना संध्याकाळी माओवाद्यांनी छुपा हल्ला केला. 

जवान मंजुनाथ हे शहीद

राञी अकरा पर्यंत चकमक सुरु होती. गडचिरोलीहून सी सिक्स्टी कमांडोचं पथक मदतीसाठी रवाना झालं असून जवानांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. मंजुनाथ असं शहीद जवानांचं नाव आहे. मंजुनाथ हे मूळचे कर्नाटक राज्यातले रहिवासी होते. तर याच चकमकीत लोकेशकुमार आणि दीपक शर्मा हे उत्तरप्रदेशचे २ जवान जखमी झाले आहेत.