Pune Cat Fight : पुण्यात चक्क एका मांजरीवरून हाणामारी

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Pune Cat Fight : पुण्यात चक्क एका मांजरीवरून हाणामारी

5 Feb 2023, 22:59 वाजता

नाशिकमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून 2 भावडांनी केलं विषप्रशान 

Nashik Suicide : नाशिकमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून दोन भावडांनी विषप्रशान केलंय. यातील एकाचा मृत्यू झालाय तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव रवींद्रनाथ कांबळे असं आहे. सावकाराने त्यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावल्याची माहितीही समोर येतीय. तसच त्यानं या दोघांना मारहाणही केली होती. त्यामुळे रवींद्रनाथ आणि त्यांचा भाऊ जगन्नाथ कांबळे यांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. रवींद्रनाथ यांच्या मृत्यूनंतर जमावानं आक्रमक होत नाशिक-पुणे रोडवर रास्ता रोको केला तसच मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय. 

5 Feb 2023, 22:55 वाजता

देवेंद्र फडणवीसांचा जितेंद्र आव्हाडांना टोला

Devendra Fadnavis on Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाबत केलेल्या वक्तव्याचा वाद चांगलाच पेटलाय. या वादात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही उडी घेतलीय. केवळ लांगुलचालन करण्यासाठी जितेंद्र आव्हाड अशी विधानं करतायेत असा टोला फडणवीसांनी लगावलाय.

बातमी पाहा-  महाराष्ट्रातील सर्व प्रमुख रेल्वे स्टेशनचा कायपालट होणार- देवेंद्र फडणवीस

5 Feb 2023, 19:42 वाजता

सत्यजित तांबेंवर बाळासाहेब थोरात बोलण्याची शक्यता

Balasaheb Thorat : सत्यजित तांबेंवर बाळासाहेब थोरात बोलण्याची शक्यता. आज रात्री 8.30 वाजता ऑनलाईन संवाद साधण्याची शक्यता. एबी फॉर्मवरून सत्यजित तांबेंचा नाना पटोलेंवर निशाणा. बाळासाहेब थोरात भूमिका स्पष्ट करणार 

5 Feb 2023, 18:15 वाजता

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांना धमकी

Nitin Deshmukh : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नितीन देशमुखांना मुंबईहून आज दोन निनावी फोन आले असून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे..हा फोन नारायण राणे समर्थकाचा असल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केलाय,. मुंबईत आतापर्यंत बेपत्ता झालेल्या नागरिकांप्रकरणी नारायण राणेंविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देशमुखांनी केलीय..फोन करणा-या व्यक्तीनं देशमुख यांना मारून समुद्रात फेकून देण्याची धमकी दिलीय..तर देशमुखांनी आव्हान स्वीकारत नरिमन पॉइंटवर मंगळवारी सकाळी 8 ते 10 वाट पाहणार असल्याचं म्हंटलंय.

बातमी पाहा- Narayan Rane यांच्यावर गुन्हा दाखल होणार? ठाकरे गटाचे आमदार Nitin Deshmukh यांची धमकीप्रकरणी मागणी

 

5 Feb 2023, 17:26 वाजता

 पुण्यात एका मांजरीवरून हाणामारी

Pune Cat Fight : एका मांजरीवरुन पुण्यात चक्क हाणामारी झालीय. 2 महिलांमध्ये ही हाणामारी झाली. आणि अखेर मांजरीचा वाद पोलीस स्टेशनमध्य पोहोचला. खडकी परिसरात एका सोसायटीमध्ये उषा वाघमारे आणि रेश्मा शेख शेजारी-शेजारी राहतात. रेश्मा यांच्याकडे एक मांजर आहे. ही मांजर शेजारी उषा यांच्याकडे गेली. रेश्मा यांनी उषाच्या घरात जाऊन मांजरीला परत आणलं, त्यावेळी रेश्मानी मांजराला शिव्या दिल्या आणि कुणाच्या घरात जायचं हे कळत नाही का, असं म्हटलं. त्यावरुन उषा संतापल्या आणि दोघींचं भांडण सुरू झालं. हे भांडण एवढं टोकाला गेलं की उषा आणि रेश्मामध्ये हाणामारी झाली. आणि हा वाद थेट खडकी पोलीस ठाण्यात पोहचला. पोलिसांनी दोघांची बाजू ऐकून एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

बातमी पाहा- एका मांजरीवरून महिलांची हाणामारी; मांजरीचा वाद पोलीस ठाण्यात पोहचला; पाहा व्हिडिओ

5 Feb 2023, 15:12 वाजता

सुजय विखेंसमोर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

Sujay Vikhe : अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांच्या समोरच कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय. नगर दौंड रोडवर असलेल्या लोणी व्यंकनाथ येथे महामार्ग बाह्यवळण रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी विखे आले होते...त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी राडा केला...रस्त्याचे काम निकृष्ट झाले असे म्हणत काही कार्यकर्त्यांनी गोंधळ केला...यावेळी सुजय विखेंनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना शांत केले...मात्र या सर्व प्रकारांमध्ये छोटेखानी उद्घाटनाचा सुरू असलेला कार्यक्रम रद्द करावा लागला...

बातमी पाहा - खासदार सुजय विखे पाटीलांच्या समोर भाजप राष्ट्रवादी कार्यकर्ते एकमेकांना भिडले

5 Feb 2023, 14:12 वाजता

आदित्य ठाकरेंची पुन्हा शिवसंवाद यात्रा

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा (Shivsamvad Yatra) सातवा टप्पा जाहीर झालाय. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) ६ फेब्रुवारीपासून नाशिक (Nashik), जालना, संभाजीनगरच्या (Sambhajinagar) दौ-यावर असणार आहेत. या जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या गावांत आदित्य जनतेशी संवाद साधणार आहेत. तसंच मेळावेही घेणार आहेत. ६ ते ९ फेब्रुवारी असा हा शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा होणार आहे. 

5 Feb 2023, 13:36 वाजता

232 चिनी अ‍ॅपवर भारतात बंदी

China App Banned In India : चीनविरोधात भारताने सर्वात मोठी कारवाई केलीय.. चीनच्या 232 अ‍ॅपवर भारतात बंदी घालण्यात आलीय.. यात झटपट कर्ज देणा-या 94 अ‍ॅपचा तर सट्टेबाजीच्या 138 अ‍ॅप्सचा समावेश आहे. गृह मंत्रालयाच्या निर्देशानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तात्काळ हे अ‍ॅप ब्लॉक करण्यास सुरुवात केलीय.. झटपट कर्ज देणारे चिनी अ‍ॅप काही तासांमध्ये बँक खात्यात कर्जाऊ रक्कम जमा करतात. मात्र त्यानंतर कर्ज तसंच व्याजाच्या वसुलीसाठी धमकी आणि मारहाणीचे प्रकार वाढले.. कर्ज मिळवण्यासाठी द्याव्या लागणा-या खासगी डेटाचा वापर करुन ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकारही समोर आले होते.  राष्ट्रीय तसंच आर्थिक सुरक्षेलाही धोका पोहोचत असल्यानं अखेर केंद्रानं या चीनी अ‍ॅपवर कारवाईचा बडगा उभारलाय.

5 Feb 2023, 12:52 वाजता

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करा, राज ठाकरेंचं मविआला आवाहन

Raj Thackeray Letter : चिंचवड (Chinchwad) आणि कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा पोटनिवडणूक (ByPoll) बिनविरोध व्हावी असं राज ठाकरेंनी (Raj Thackeray) म्हटलंय..अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उमदेपणा भाजपने दाखवला तसाच महाविकास आघाडीने आता उमदेपणा दाखवावा.. असंही राज ठाकरे म्हणाले.. सविस्त बातमी पाहण्यासाठी इथं क्लिक करा

बातमी पाहा - राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीबाबत मोठे भाष्य

5 Feb 2023, 12:10 वाजता

पाकिस्तानचे माजी लष्करशाह परवेझ मुशर्रफ यांचं दुबईत निधन

Parvez Musharraf Death : पाकिस्तानचे माजी माजी लष्करशाह परवेझ मुशर्रफ (Parvez Musharraf) यांचं निधन झालंय. गेल्या काही महिन्यांपासून दुबईत त्यांच्यावर उपचार सुरू होते. परवेझ मुशर्रफ हे विविध आरोपांखाली पाकिस्तानातून पळून गेले होते. त्यांना पाकिस्तानी कोर्टाने फाशीची शिक्षाही सुनावली होती. दुबईत (Dubai) गेल्या काहीवर्षांपासून त्यांनी आसरा घेतला होता. पाकिस्तान आर्मीत तोफखाना दलात त्यांनी आपल्या लष्करी कारकिर्दीची सुरूवात केली. भारताशी झालेल्या 1965, 1971 च्या युद्धात त्यांनी पराभवाचा सामना केला होता. कारगिल युद्धाचे (Kargil War) सूत्रधार अशी मुशर्रफ यांची ख्याती होती. कारगिल युद्धातही मुशर्रफ यांना पराभव सहन करावा लागला. नंतर नवाझ शरीफ यांचं सरकार उलथवून पाकिस्तानात पुन्हा लष्करशाही स्थापन केल्यावर मुशर्रफ यांनी भारताशी शांतीवार्तेचाही प्रयत्न केला. त्यासाठी वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी दिल्लीवारीही केली होती. पण तेव्हा काश्मीरचा मुद्द्यावर मुशर्रफ अडून राहिल्यामुळे ती चर्चा फिसकटली. भारताविषयी आत्यंतिक द्वेष, काश्मीर आणि पाणी याच मुद्यांवरून भारत आणि पाकिस्तान यांची युद्ध होत राहतील हा मुशर्रफ यांचा प्रबंध लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडिजमध्ये बराज गाजला होता. 

बातमी पाहा - पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास