काही महिलांचे कौटुंबिक नाते खूप टॉक्सिक असते. त्यांच्या नात्यात मारामारी, भांडण आणि शिवीगाळ या अगदी सामान्य गोष्टी असतात पण तरीही ते असे नाते टिकवून ठेवतात. अशा महिला वेगळे होण्याचा विचार करत नाहीत. असे का घडते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? कितीही नात्यात त्रास सहन करावा लागला तरीही या महिला आपल्या जोडीदारापासून वेगळे होण्याचा का निर्णय घेत नाहीत. यामागचं कारण समजून घेणे गरजेचे आहे.
माझ्या शेजारी एक जोडपे आहे त्यांच्या घरातून नेहमी भांडणाचे आवाज ऐकू येतात. मी त्यांना कधीही एकमेकांशी प्रेमाने बोलताना पाहिले नाही. अगदी आजूबाजूच्या कोणाशीही ते प्रेमाने बोलत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या लग्नाला जवळपास 7 वर्षे झाली आहेत. एवढी वर्षे ते एकमेकांना कसे आणि का सहन करत आहेत याचा विचार करून आश्चर्य वाटले. पण अशावेळी त्या महिलेच्या मनातील विचार समोर आल्यावर धक्काच बसला. टॉक्सिक नातं अजूनही महिला का वेगेळ्या होत नाही यामागचे कारण समोर आले आहे.
अशा नात्यात राहण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लोक काय म्हणतील. स्त्रियांना याची सर्वाधिक भीती वाटते आणि त्यामुळेच त्यांना इच्छा असूनही त्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलल्या नाहीत. आजही आपल्या समाजात पतीविरोधात बोलणाऱ्या महिलांकडे आदराने पाहिले जात नाही. बऱ्याच वेळा लोकांना स्त्रिया आपल्या नात्याबद्दल खोटं सांगताना दिसतात. कारण त्यांच्यासोबतच लोकांच्या वागण्यातही बदल दिसून येतो. या सगळ्याचा विचार करून महिला असं नातं सहन करत राहते.
या कारणामुळेच महिला कितीही नातं नको असले तरीही त्यामधून बाहेर पडत नाहीत. जेव्हा एखादी स्त्री आपल्या पतीवर पूर्णपणे अवलंबून असते तेव्हा तिला वेगळे होण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. विशेषत: जर तुम्हालाही मुले असतील. म्हणूनच, स्त्रियांना लहानपणापासूनच स्वावलंबी बनवणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या स्वतःच्या बाजूने उभ्या राहू शकतील आणि अशा आव्हानांना तोंड देण्याचे धैर्य मिळवू शकतील.
महिलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव हे देखील टॉक्सिक नातेसंबंध टिकण्याचे एक प्रमुख कारण आहे. जोडीदारावर अवलंबून राहिल्यामुळेही ही समस्या उद्भवते. विभक्त झाल्यानंतर जीवन कसे असेल, गोष्टी कशा सांभाळाव्यात याची चिंता या महिलांना लागून राहिलेली असते. आत्मविश्वास कमी असल्यामुळे महिला कोणताच निर्णय धाडसाने घेऊ शकत नाहीत.
स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त भावनिक असतात. एकत्र राहताना ती केवळ आर्थिकच नाही तर भावनिकदृष्ट्याही तिच्या जोडीदारावर अवलंबून असते. ही गोष्ट टॉक्सिक नात्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावरही येते. यामुळे अनेकदा महिला आवाज उठवण्याऐवजी गप्प राहणे पसंत करतात. महिला भावनिक गुंतवणूकीला अधिक महत्त्व देतात.
एकटेपणा ही एक वेगळ्या प्रकारची भावना आहे. पण टॉक्सिक नातेसंबंधात राहण्यापेक्षा ते खूप चांगले आहे. स्त्रिया अनेकदा एकटेपणाबद्दल विचार करून वेगळे होण्यापासून दूर जातात. आत्मविश्वासाचा अभाव आणि भावनिक गुंतागुंत यामुळे महिला वेगळे होण्याचा विचार करत नाही.
टॉक्सिक नातेसंबंध टिकून राहिल्यानंतर दिसणारी आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे महिलांना सकारात्मक बदलांची अपेक्षा असते. त्यांना वाटते की, त्यांचे प्रेम आणि वागणूक त्यांच्या जोडीदाराच्या वागण्यात एक दिवस नक्कीच बदल घडवून आणेल. अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही, पण हजारो प्रयत्न करूनही जर तुमच्या जोडीदाराची वागणूक बदलत नसेल तर इथे तुम्हाला स्वतःला सुधारण्याची गरज आहे.