Mosquito Bites Interesting Facts : आपल्यापैकी अनेकांचा अनुभव असेल की, ५-६ लोकं एकत्र उभे असतील फक्त २ ते ३ लोकांनाच मच्छर चावतात. आणि बाकीच्या लोकांना मात्र मच्छर असल्याचं कळतंही नाही. मग असं का होतं? हेच कारण आपण आज समजून घेणार आहेत. गरोदर महिलांना आणि लठ्ठ लोकांना का चावतात मच्छर?
संशोधनात असे समोर आले आहे की, गडद कपड्यांऐवजी हलक्या रंगाचे कपडे घातले तर डासांचा धोका कमी होतो. डेंग्यू पसरवणारा एडिस हा डास पायाऐवजी हाताला चावतो, तर मलेरिया पसरवणारा डास पायाला चावतो. त्यामुळे पावसाळ्यात पूर्ण कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो. हलक्या रंगाचे कपडे घालून तुम्ही डास टाळू शकता.
मेटाबॉलिक रेट : बऱ्याच वेळा असे दिसून आले आहे की, मनुष्याच्या चयापचय गतीमुळे देखील डास आकर्षित होतात. शरीरातून कार्बन डायऑक्साइड सोडला जातो. डासांना खूप आकर्षित करते.
गर्भवती महिला सामान्य व्यक्तीच्या तुलनेत 20 टक्के जास्त कार्बन डायऑक्साइड सोडते. त्यामुळेच डास जास्त चावतात. तसेच गरोदरपणात श्वास घेतल्याने फुफ्फुसातून जास्त कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. त्यामुळे डास जास्त चावतात.
गर्भवती महिलेच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात. म्हणजे शरीरात अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होतात. हार्मोन्स शरीरात अधिक चयापचय आणि अधिक उष्णता निर्माण करतात. त्यामुळे शरीराचे तापमान वाढू लागते. शरीराचे तापमान वाढल्यामुळे डास स्वतःकडे आकर्षित होतात.
'O' रक्तगट असलेल्या लोकांचा मेटाबॉलिक रेट जास्त असतो आणि त्यामुळे अशा लोकांकडे डास जास्त आकर्षित होतात. गर्भवती स्त्रिया आणि लठ्ठ लोकांमध्ये चयापचय दर जास्त असतो ज्यामुळे डास त्यांना जास्त चावतात.
रक्तगट: विशिष्ट रक्तगट असलेल्या लोकांना डास जास्त चावतात. O रक्तगट असलेल्या लोकांना विशेषतः डास चावतात.
त्वचेचे बॅक्टेरिया: त्वचेच्या बॅक्टेरियामुळे डास जास्त चावतात. अलीकडील अभ्यासानुसार, डास विशिष्ट जीवाणू असलेल्या माणसांना प्राधान्य देतात. ज्या लोकांच्या त्वचेत अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. त्यांना डास जास्त चावतात.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)