Viral Video : डिजिटल मीडियाच्या उपलब्धतेमुळं जग खऱ्या अर्थानं जवळ आलं असं म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून दर दिवशी असंख्य व्हिडीओ, फोटो आणि तत्सम गोष्टी तुमच्या भेटीला येणंसुद्धा याच माध्यमाचा एक भाग. अशा या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओला सध्या प्रचंड पसंती मिळताना दिसतेय. हा व्हिडीओ नेमका इतका का गाजतोय तुम्हाला माहितीये?
एकदा तो व्हिडीओ तुम्ही पाहाच. कारण, तो पाहून तुम्हालाही भूक लागेल. हा व्हिडीओ आहे खाद्यपदार्थांचा. आता तुम्ही म्हणाल असे शेकडो व्हिडीओ आम्ही पाहिलेयत. हे असं काहीतरी म्हणून हा व्हिडीओ Skip करू नका. कारण, तो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.
जितक्या आवडीनं तुम्ही पाव, ब्रेड, केक, पेस्ट्री, पफ अशा बेक केलेल्या गोष्टी खाता त्या नेमक्या तयार कशा होतात हे तुम्हाला या व्हिडीओच्या माध्यमातून पाहता येत आहे. कमालीची व्हिडीओग्राफी, तंत्रज्ञान आणि इतर गोष्टींची जोड घेऊन साकारण्यात आलेला हा व्हिडीओ आहे बेकिंगच्या टाईमलॅप्सचा. जिथं तुम्हाला अनेक पदार्थ बेक झाल्यानंतर ते कसे दिसतात आणि मुळात ते कसे बेक होतात हे अगदी जवळून पाहायला मिळत आहे.
cook_as_you_feel_it या इन्स्टा हँडलच्या माध्यमातून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जिथं सर्वसाधारण केकच्या मिश्रणापासून केक लोफ कसा तयार होतो, अनेक पदर असलेली पेस्ट्री कशी खुसखुशीत होते हे कळत आहे. बरं, फक्त कळत नाही तर हे पदार्थ खात असताना त्या पदार्थांची चव चाखण्याचीही उत्सुकता आपल्यापर्यंत पोहोचत आहे.
सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या आणि अनेकदा शेअर केल्या जाणाऱ्या या व्हिडीओवर Likes ची बरसात सुरु असून सध्या तो अनेक ग्रुप, स्टेटस आणि स्टोरीजमध्येही शेअर केला जात आहे. थोडक्यात काय, तर दिवसाचा क्षीण घालवण्यासाठी हे सुरेख खाणं तुमही मदत करत आहे... नाही का?