चाणक्य नितीपेक्षा धक्कादायक आहेत विदुर नितीचे दावे; महिलांच्या स्वभावाबद्दल काय आहे मत?

Vidur Niti On Woman: माणसाचे अवगुण आणि गुणांचा लेखाजोखा आचार्य चाणक्य नितीत केला आहे.  चाणक्य नितीप्रमाणेच आता विदुर शास्त्रदेखील आहे. 

Updated: Feb 9, 2024, 04:58 PM IST
चाणक्य नितीपेक्षा धक्कादायक आहेत विदुर नितीचे दावे; महिलांच्या स्वभावाबद्दल काय आहे मत? title=
Vidur Niti On Woman has more shocking than Chanakya niti on character of woman

Vidur Niti On Woman: चाणक्य नितीबाबत तर तुम्हाला माहितीयेच. आचार्य चाणक्य यांनी व्यक्तीचे स्वभाव, महिलांचे गुण आण व्यवहारात कसे चतुर असावे, यावर लेखन केले आहे. त्याला चाणक्य निती असं म्हणतात. महिलांचे गुण आणि स्वभाव याबाबत जितकं चाणक्य यांनी लिहलं आहे तितकंच महाभारतातील महात्म विदुर यांनीही आपले विचार मांडले आहेत. चाणक्यांनी महिलांचा मान-सन्मान, चरित्र यावर प्रकाश टाकला आहे तर विदुर यांनी महिलांचे गुण-अवगुण याबाबत लिखाण केलं आहे. 

विदुर यांनी म्हटलं आहे की, या सृष्टीची आणि जीवनाची कल्पना स्त्रियांशिवाय करता येत नाही. महात्मा विदुर यांनी त्यांच्या नितीमध्ये लिहलेल्या गोष्टी वाचून महिलांना अधिक आनंद होईल. विदुर यांच्या मते, सनातन धर्मात महिलांना देवीचा दर्जा दिला आहे आणि जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो तिथे देवाचा वास असतो. 

महिलांचा स्वभाव

महात्मा विदुर यांनी महिलांना भाग्यशाली व सौभाग्यशाली म्हटलं आहे. विदुर म्हणतात की, प्रकृतीने स्वतः स्त्रियांना त्यांच्या स्वभाव म्हणूनच अनेक वरदान दिले आहेत. महिला सौम्य, शालीन, कुलीन आणि समजूतदार स्वभावाच्या असतात. ज्या घरातील महिला समजूतदार असतात. त्या घरात नेहमी सुख शांती नांदते. त्या घरात कधीच कोणत्या गोष्टींची कमी भासत नाही. 

घरातील लक्ष्मी

शास्त्रांमध्ये महिलांना लक्ष्मी म्हणूनही संबोधले जाते. विदुरदेखील म्हणतात की, महिला या घरातील लक्ष्मी आहेत. पुर्वीच्या काळात नेहमीच आपले पूर्वज धन, धान्य महिलांच्या हातातच देत असतं. म्हणूनच महिलांना घरातील लक्ष्मी म्हटले जातात. 

महिला सन्मानपूर्वक 

महात्मा विदुर यांनी म्हटलं आहे की, घरात महिलांचा मान-सन्मान केला जातो तिथे देवी-देवता प्रसन्न होतात. ज्या घरात महिलांना सन्मान केला जात नाही तिथे देवता राहत नाही. त्यामुळं घरातील महिलांना नेहमी आदर व सन्मान द्या. 

सुख-समृद्धी घेऊन येतात महिला

जीवनात यश आणि सुख-समृद्धी मिळवण्यासाठी महिलांचा मान-सन्मान करणे खूप गरजेचे असते. कारण मनुष्य आयुष्यभर कोणत्या न कोणत्या महिलेच्या सानिध्यात राहत असतो. एखाद्या व्यक्तीच्या यशात महिलेचा मोलाचा वाटा असतो. महिलेच्या त्यागामुळंच तो पुरुष यशस्वी होत असतो. स्त्रीशिवाय एखाद्या पुरुषाचे अस्तित्वच नाहीये. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)