Baby Girl Names on Ramayan : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य मंदिरात रामावर अभिषेक होणार आहे. श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिरामध्ये दुपारी साडेबाराच्या मुहूर्तावर श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यावेळी फक्त पाच जणांना सोहळ्यावेळी गर्भगृहात उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्य पुजारी यांचा समावेश असणार आहे. मूर्तीला प्रथम पंतप्रधान मोदी आरसा दाखवून सोहळ्यास प्रारंभ करतील, असे विश्वस्त मंडळाने गुरुवारी स्पष्ट केले.
रामयणाचा खूप मोठा प्रभाव आपल्या सगळ्यांवरच आहे. प्रभू राम आणि रामायणातील इतर सगळ्याच व्यक्तींचा आपल्यावर प्रभाव असतो. अशाच रामायणातील काही मुलींची नावे आपण येथे जाणून घेणार आहोत. ही नावे तुम्ही तुमच्या मुलींसाठी नक्कीच निवडू शकता.
अहिल्या: रामायणातील पवित्र व्यक्तीमत्त्व म्हणजे 'अहिल्या'. 'अहिल्या' अतिशय पवित्र आणि सुंदर स्त्री होती. अहिल्या नावाचा अर्थ "सुंदर" असा आहे. अहिल्या या नावाचा शुभांक 11 आहे. गौतम ऋषींची पत्नी किंवा भगवान रामाने वाचवलेली स्त्री, संस्कृत, भारतीय वंशाची आहे. अ
इप्सिता: तुम्ही तुमच्या मुलीचे नावही 'इप्सिता' ठेवू शकता. रामायणातही या नावाचा उल्लेख आहे. इप्सिता नावाचा अर्थ "इच्छा" असा आहे.
जानकी : . देवी सीता ही राजा जनकाची कन्या होती, म्हणून तिला 'जानकी' असेही संबोधले जात असे.
कौशल्या: भगवान रामाच्या आईचे नाव 'कौशल्या' आहे. कौशल्या नावाचा अर्थ "बुद्धी आणि प्रतिभा" असा आहे. तुमच्या मुलीलाही हे नाव आवडेल.
अलेख्या : जर तुमच्या मुलीचे नाव 'अ' अक्षरावरून पडले असेल तर तुम्ही तिला 'अलेख्या' हे नाव देऊ शकता. हे एक अतिशय गोंडस आणि अद्वितीय नाव आहे. 'आलेख्य' नावाचा अर्थ चित्र आहे. जे लिहिता येत नाही किंवा ज्याचा उल्लेख करता येत नाही, असा अलेख्या नावाचा अर्थ आहे.
इशिका : रामायणात युद्धादरम्यान शस्त्रे वापरली गेली आहेत आणि शस्त्रांना 'इशिका' असेही म्हणतात. हे केवळ अद्वितीयच नाही तर आधुनिक नाव देखील आहे. 'इशिका' म्हणजे अतिशय तेज, शस्त्राप्रमाणे तिष्ण. या नावाचा विचार नक्की करू शकता.
सुमित्रा : रामायणात, लक्ष्मणाच्या आईचे नाव देवी सुमित्रा होते. सुमित्रा नावाचा अर्थ "सोबती किंवा मित्र" असा आहे. माता सुमित्रा हे त्याग आणि संयमाचे प्रतीक आहे. तुम्हाला देखील तुमची मुलगी एक मैत्रिण वाटत असेल तर तुम्ही या नावाचा विचार करायला हवा.
शबरी : रामाच्या एका महान भक्ताचे नाव 'शबरी' होते. जर तुमच्या मुलीचे नाव 'S' अक्षरावरून आले असेल तर तुम्ही तिचे नाव शबरी असे ठेवू शकता. हे नावही छान आहे. शबरी जिने परमेश्वराला नितांत प्रेम केलं. श्रद्धा केली. हे नाव तुम्हाला परमेश्वराशी जोडू शकते.
सुमाली : महापंडित आणि विद्यान असलेल्या रावणाच्या आजोबांचे नाव 'सुमाली' होते. तुम्ही देखील हे नाव निवडू शकता आणि रामायणाचे सार तुमच्या आयुष्यात कायमचे मिळवू शकता. सुमाली हे जरी तेव्हा पुरूषाचे नाव असले तरीही तुम्ही हे आता मुलीकरता निवडू सकता.
तारा : रामायणातही 'तारा' नावाच्या स्त्रीचा उल्लेख आहे. 'तारा' नावाचा अर्थ नक्षत्र, राणी आणि समुद्राची देवी आहे. भगवान बुद्धांच्या पत्नीचे नाव देखील तारा होते.
शांता : शास्त्रानुसार भगवान रामाच्या बहिणीचे नाव 'शांता' होते. शांता नावाचा अर्थ "शांतता" असा आहे. या नावाचा अर्थ "शांततापूर्ण" आहे. अंकशास्त्र मूल्य 9 वर आधारित आहे.