भरगोस पगार, डेटवर जायला स्पेशल लीव्ह; गर्लफ्रेंडचा खर्चही उचलणार! कुठे आहे ही कंपनी?

थायलंडची एक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना डेटिंगसाठी विशेष सुट्टी देत ​​आहे.

पुजा पवार | Updated: Sep 10, 2024, 07:46 PM IST
भरगोस पगार, डेटवर जायला स्पेशल लीव्ह; गर्लफ्रेंडचा खर्चही उचलणार! कुठे आहे ही कंपनी? title=
(Photo Credit : Social Media)

Thai Company Offers Paid Tinder Leave To Employees: सध्या सोशल मीडियामुळे मोबाईलचा वापर प्रचंड वाढला आहे. पूर्वी लग्नासाठी चांगलं स्थळ शोधण्याकरता नातेवाईकांची मदत घेतली जायची. मात्र हे काम डेटिंग किंवा मॅट्रिमोनिअल साईट्समुळे एका क्लिकवर आलंय. अनेकजण ऑनलाईन डेटिंग अ‍ॅपद्वारे आपला जोडीदार शोधत आहेत. मात्र अनेकदा जोडीदाराला भेटण्यासाठी ऑफिसच्या सुट्ट्यांवर अवलंबून राहावे लागते, पण जर कंपनीनेच तुम्हाला डेटिंगसाठी खास सुट्टी दिली तर... तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. थायलंडची एक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना डेटिंगसाठी विशेष सुट्टी देत ​​आहे.

6 महिन्यांचं अ‍ॅप सब्सक्रिप्शन फ्री : 

सोशल मीडिया प्लेटफॉर्म लिंक्डइनवर सध्या थायलंडच्या एका कंपनीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना डेटिंगसाठी विशेष सुट्टी देणार असल्याचे सांगितले आहे. काहीच दिवसांपूर्वी Whiteline Group ने एक पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली, जे कळल्यावर लोक हैराण झाले. कंपनीचं म्हणणं आहे की, ते कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांचं अॅप सब्सक्रिप्शन देईल. व्हाइटलाइन ग्रुपने पोस्टमध्ये लिहिले की, ते आपल्या कर्मचाऱ्यांना 6  महिने मोफत टिंडर प्लॅटिनम आणि टिंडर गोल्डची सुविधा देतील. 

हेही वाचा : हत्तीच्या विष्टेपासून तयार केली जाते जगातील सर्वात महागडी कॉफी; एक किलोसाठी मोजावे लागतात तब्बल इतके रुपये

leaves for dating

 

कंपनी डेटवर जाणाऱ्यांना देणार पैसे : 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कंपनीतील जे कर्मचारी टिंडर सुट्टी घेऊ इच्छितात अशांना एक दिवसापूर्वी सुट्टीचे अर्जकरावे लागेल. असं म्हंटल जातंय की कर्मचारी डेटवर जाण्यासाठी कोणत्याही वेळी सुट्टीसाठी अर्ज करू शकतात. एवढंच नाही तर कंपनी डेटवर जाणाऱ्यांना पैसे देण्याचाही विचार करत आहे. मात्र टिंडर लिव्ससाठी किती दिवसांची सुट्टी दिली जाईल याबाबत माहिती सांगण्यात आलेली नाही.