स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त जाणून घेऊया मुला-मुलींची नावे, राहिल कायम आशिर्वाद

Swami Samarth Prakat Din : स्वामी समर्थ यांचे आज प्रकट दिन आहे या निमित्ताने आपण काही मुलांची नावे पाहणार आहोत. ज्या नावांमध्ये असेल स्वामींचा विशेष आशिर्वाद. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 10, 2024, 12:31 PM IST
स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त जाणून घेऊया मुला-मुलींची नावे, राहिल कायम आशिर्वाद  title=

श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आज प्रकट दिन साजरा केला जातो. पण स्वामी कधी आणि कुठून आले याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती नाही. पण एका कथेनुसार, श्री स्वामी समर्थ महाराज  वटवृक्षाजवळ प्रकट झाले होते असे मानले जाते. हे वटवृक्ष पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून 24 किमी अंतरावर असलेल्या छेली खेडा नावाच्या गावात असल्याच सांगण्यात येते. 1856 मध्ये अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात त्यांचे दर्शन झाले, तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया तिथी होता, त्यानुसार या वर्षी 10 एप्रिल रोजी स्वामीजींचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे. 

या दिवशी जर तुमच्या घरी गोंडस मुलाचा जन्म झाला असेल तर तुम्ही खालील नावांचा विचार करु शकता. महत्त्वाचं म्हणजे या नावांमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा विशेष आशिर्वाद असल्याच सांगण्यात येतं. स्वामी समर्थ जी महाराज हे श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतर भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार मानले जातात. त्यामुळे या नावांमध्ये या तिन्ही चैतन्य शक्तींचा वास पाहायला मिळेल. 

स्वामींच्या नावावरुन मुलांची नावे-अर्थ 

श्री - 'श्री' हे एक अक्षरी असं मुलासाठी अतिशय खास नाव आहे. या नावात स्वामींच्या नावाचा श्री आहे. तसेच या नावाचा अर्थ आहे लक्ष्मी. 

स्वामी  - 'स्वामी' हे अडीच अक्षरी असलेले असे नाव आहे. ज्या भाविकांना महाराजांना स्वामींच्या नावावरुनच नाव ठेवायचं असेल तर हा अतिशय चांगला पर्याय आहे. 

जय - 'जय' या नावाचा अर्थ आहे जो कायमच विजयी असतो असा. या नावावरही स्वामीजींचा विशेष आशिर्वाद आहे. 

श्रेष्ठ - सर्वोत्कृष्ट, अंतिम, भगवान विष्णूचे दुसरे नाव, प्रथम,परिपूर्णता आणि सर्वोत्तम असा या नावाचा अर्थ आहे. 

(हे पण वाचा - 'अशक्यही शक्य करतील स्वामी...', स्वामींच्या नावावरून मुलींची नावे आणि अर्थ)

चैतन्य - 'चैतन्य' या नावातच दिव्य शक्ती आहे. स्वामींच्या आशिर्वादाने भरलेलं हे नाव अतिशय खास आहे. 

हर्ष- 'हर्ष' या नावाचा अर्थ आहे आनंद, मनाला शांतता देणार असं नाव मुलासाठी नक्कीच निवडू शकता. 

प्रणेश - जीवनाचे प्रभु असा या नावाचा अर्थ आहे. या नावावर देखील स्वामींचा विशेष आशिर्वाद आहे.

वरद - 'वरद' हे नाव गणपतीच्या नावावरुन घेण्यात आलंय. वरद या नावावरही स्वामींचा विशेष आशिर्वाद राहील.