Summer special News In Marathi : वाढत जाणाऱ्या उकाड्यामुळे शरीरातून निघाणाऱ्या घामाचा निचरा बऱ्याच वेळेस योग्य पद्धतीने होत नाही. वातावरणातील वाढत जाणारे तापमान आणि शरीरातील तापमान संतुलित राखणं महत्त्वाचं आहे. गरमीमध्ये शरीरातील पाण्याची मात्रा भरून काढण्यासाठी आपण सरबत, थंड पाणी, किंवा शरीराला थंडावा मिळण्याकरीता शीतपेयांच्या मोठ्या प्रमाणात सेवन करतो. त्याचप्रमाणे वाढत्या उष्णतेपासून शरीराचा विषेत: त्वचेचा बचाव करण्यापासून गरमीच्या दिवसात कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावे ते जाणून घेऊयात....
कॉटनचे कपडे
तज्ञांच्या मते, उन्हाळ्यात त्वचाविकार होण्याची शक्यता जास्त असते. शरीरातून घामावाटे नको असलेले क्षार बाहेर पडतात. त्यामुळे त्याचा गंभीर परिणाम हा त्वचेच्या आरोग्यावर होतो. म्हणूनच गरमीच्या दिवसात सुती कॉटनचे कपडे परिधान करणं फायदेशीर ठरतं. कॉटनचे कपडे परिधान केल्याने अतिरिक्त घाम येण्यावर नियंत्रण येते. कॉटनचे कपडे घाम शोषून घेतात. त्यामुळे त्यामुळे घामामुळे येणारी खाज, पुरळ याचं प्रमाण कमी होतं. कॉटनच्या कपड्यांनी गरमीचा त्रास होत नाही. त्याचप्रमाणे फिकट पांढऱ्या रंगाच्या कॉटन फॅब्रिकच्या वापराने सूर्याची किरणं परावर्तीत होतात. त्यामुळे बाहेर फिरताना ऊन्हाच्या झळा जाणवत नाही.
कॉटन फॅब्रिक व्यातिरिक्त बाजारात वेगवेगळे प्रकार आहेत. ऊन्हाळा सुरू झाला की, कॉटनच्या कपड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. बाजारात कोणकोणते फॅब्रिकचे प्रकार आहेत ते जाणून घेऊयात.
लिनेन
कॉटनला पर्याय म्हणूनही लिनेन फॅब्रिकचा वापर केला जातो. उन्हाळ्यात घट्ट कपडे वापरल्याने शरीरातील तापमान संतुलित राहण्यास समस्या निर्माण होते. त्यामुळे लाल चट्टे,जळजळ होणं अशी समस्या उद्भवते. लिनेनचं फॅब्रिक सैलसर असतं. त्यामुळे ते घाम येऊन त्वचेला चिटकत नाही. म्हणूनच खास गरमीच्या दिवसात तुम्हाला कपड्यांची शॉपिंग करायाची असल्यास तुम्ही लिनेन फॅब्रीक नक्की ट्राय करा.
खादी
स्वातंत्र्याच्या आधीच्या काळापासून खादीला फार महत्त्व आहे. खादीच्या कपड्यांना फक्त भारतातच नाही तर जागकिक पातळीवर मोठ्या प्रामाणात पसंती दर्शवली जाते. महात्मा गांधाच्या अमूलाग्र कार्याकरीता जसं खादीला महत्त्वआहे अगदी तसंच उन्हाळ्यात खादीच्या कपड्यांना बाजारात मोठी पसंती मिळते. तुम्ही खादीच्या वेगनेगळ्या डीझाइन्सचे कुर्ती आणि टी-शर्ट नक्की वेअर करू शकता.