तुम्ही पण चहा घेतल्यानंतर उरलेली पावडर फेकून देण्याची चूक करता? मग, एकदा वाचाच

Easy Ways to Recycle Used Tea Leaves:  स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या चेहऱ्याची चमक वाढवू शकता. यापैकी म्हणजे चहापती किंवा उरलेला चहा पावडरचा वापर आपण उत्तम आरोग्यासाठी करु शकते. नेमकं याचा वापर तुम्ही कसा करु शकता ते जाणून घ्या... 

Updated: Jan 19, 2024, 04:33 PM IST
तुम्ही पण चहा घेतल्यानंतर उरलेली पावडर फेकून देण्याची चूक करता? मग, एकदा वाचाच  title=

Tips For Recycling Your Used Tea Leaves News In Marathi : भारतात चहा हा प्रत्येक घरात प्यायला जातो. सकाळी उठल्याबरोबर, मूड फ्रेशकरण्यासाठी, ताजेतवान वाटेण्यासाठी अशा अनेक कारणांसाठी चहा पितचं असतो. पण चहा पिण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी ही उत्तम ठरु शकतो. जसे की, चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी विविध घरगुती उपाय केले जातात. यासाठी स्वयंपाकघरातील अनेक वस्तू वापरल्या जातात. दुसरी प्रभावी गोष्ट म्हणजे चहाची पाने. चहा झाल्यावर उरली चहाची पावडर आपण फेकून देतो. पण तुम्हाला माहित आहे का, जर तुम्ही त्वचेच्या काळजीसाठी चहाच्या पानांचा वापर केला तर तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल. तुम्ही त्याचा योग्य वापर केल्यास तुम्हाला आश्चर्यकारक फरक दिसेल. चमकदार त्वचा मिळविण्यासाठी चहाची पाने आणि त्याचे फायदे कसे वापरावे ते जाणून घ्या.

त्वचेची काळजी घेण्यासाठी चहा पावडरचा स्क्रब वापरणे शक्य आहे. यासाठी चहा ची पाने थोड्या पाण्यात टाकून उकळवा. नंतर त्याचे पाणी काढून टाका आणि उरेली पावडर स्वच्छ पाण्याने धुवा. नंतर त्यात थोडे मध, गुलाबपाणी, तांदळाचे पिठ आणि लिंबाचा रस घालून स्क्रब तयार करा आणि चेहऱ्याला लावा आणि मसाज करा. पंधरा मिनिटे ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा.

टॅनिंग निघून जाईल

टॅनिंग दूर करण्यासाठी चहा पावडर खूप प्रभावी आहे. दरम्यान चहाच्या पानांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट घटक त्वचेची टॅनिंग आणि सनबर्नपासून मुक्त होण्यास मदत होते. याच्या वापराने चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते आणि त्वचा खूप मऊ आणि कोमल बनते.

डेड स्किन निघते

चहाची पावडर त्वचेवरील डेड त्वचा काढून टाकण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी तुम्ही चहाच्या पानांचा स्क्रब बनवून पंधरा दिवसांतून एकदा वापरू शकता. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकते.

काळे डाग कमी होण्यास मदत

काळे डाग चेहऱ्याच्या सौंदर्यात बाधा आणतात. फक्त समस्या कमी करण्यासाठीच नाही तर चहाच्या पावडरपासून बनवलेला स्क्रब देखील खूप उपयुक्त आहे. त्यामुळे काळे डाग कमी होऊन त्वचा मुलायम होते.

तेलकट त्वचा

तेलकट त्वचेपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही चहा पावडर वापरू शकता. मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट घटक असल्यामुळे ते तेलकट त्वचा आणि त्वचेच्या समस्या कमी करण्यात चांगली भूमिका बजावते.