How To Impress Girl in Marathi: तरुणींना इम्प्रेस करणं काही सोप काम नाही. चांगल्या चांगल्या तरुणी इम्प्रेस करताना तरुणांना घाम फुटतो. त्यात फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना. बुधवारी 7 फेबुवारीपासून Valentines Week ला सुरुवात होणार आहे. अशात Valentines Day पर्यंत तुमच्या प्रिय व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी खास टिप्स...(Relationship Tips how to impress girl tips in marathi Valentine Week 2024)
नीटनेटके कपडे परिधान करा
तरुणांना पुरुषांना नीटनीटके आणि सुंदर कपड्यांमध्ये पाहणे आवडते. त्यात तुम्ही साधे आणि विनम्र असाल तर महिला अधिक आकर्षित होतात.
महिलांच्या डोळ्यात बघा
एखाद्या तरुणीशी तुम्ही बोलत आहात आणि तुम्हाला तिला इम्प्रेस करायच असेल तर तिच्या डोळ्यात डोळे घालून बोला. त्यातून तुमचा कॉन्फिडन्स तिला दिसेल आणि तिची छाप तिच्यावर पडेल.
महिलांशी समानरुपाने व्यवहार करा
कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की, महिला आणि पुरूष दोघेही समान असून तुम्ही तिच्या वागताना बोलताना ती गोष्ट जाणवली पाहिजे. त्याशिवाय महिलेसोबत पुरूष मित्रासारखं चुकूनही वागू नका.
शिव्या टाळा
तरुणींशी बोलताना शिव्या वापर बोललेलं आवडत नाही. त्यामुळे शब्द आणि सुंदर भाषा वापरा.
हेसुद्धा वाचा - Happy Rose Day : तू माझ्या आयुष्यातील सुंदर गुलाब आहेस; अन्...
तुमचा मुद्दा प्रभावीपणे मांडा
मुलीसोबत बोलताना त्यांच्याशी तुमचा मुद्दा हा प्रभावीपणे मांडा.
सेक्सबद्दल बोलू नका
तरुणी या सेक्सकडे भावनिकदृष्ट्या बघत असतात. जोपर्यंत तुम्ही तरुणीचा विश्वास जिंकत नाही तोपर्यंत तिच्याशी सेक्सबद्दल बोलू नका.
नात्यात इमानदार राहा
महिलेसमोर मोठमोठ्या आणि भपक्या गोष्टी टाळा. खोटेपणा तुमचं नातं कमजोर करतो म्हणून कायम खरं बोला.
रागावर नियंत्रण ठेवा
उगाचच चिडचिड करु नका. शिवाय रागावर नियंत्रण ठेवून तरुणींशी बोला. सतत रागराग करणारी व्यक्ती तरुणींना आवडत नाही.
मुलींना स्वतःबद्दल ऐकायला आवडतं
तरुणींना तिचं कौतुक, प्रशंसा आणि तिच्याबद्दल बोललं आवडतं.
मुलींना उज्वल भविष्याची स्वप्ने दाखवा
तरुणींना भविष्याची स्वप्न पाहणे खूप आवडतं. त्यामुळे तिच्याशी उज्वल भविष्याबद्दल बोला.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही.)