पालकत्व, मुलांच संगोपन या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. कारण मुलांना फक्त शैक्षणिक शिक्षण नाही तर त्यासोबतच दैनंदिन जीवनात कसं जगावं? याचं शिक्षण देणेही तितकेच गरजेचे आहे. पालकांनी मुलांना अगदी लहान वयापासूनच स्पर्श ज्ञान देणे अत्यंत गरजेचे आहे. कारण स्पर्शावरुन त्या व्यक्तीचा हेतू काय? हे समजते. त्यामुळे मुलांना सतर्क करणे हे पालकांचेच काम आहे. अशावेळी मुलांना कशापद्धतीने गुड टच आणि बॅड टच शिकवावे, हे अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. छाया वजा यांनी सांगितल्या टिप्स.
अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. छाया वजा म्हणाल्या की, वयाच्या आधारे लैंगिक ज्ञान मुलांना योग्य वयात लैंगिक शिक्षणाची माहिती दिली पाहिजे, जेणेकरून ते चुकीच्या मार्गावर जाऊ नयेत. तज्ज्ञांच्या मते, मुलांना योग्य वयात आणि योग्य पद्धतीने लैंगिक शिक्षण देणं खूप गरजेचं आहे. हे मुलाच्या चार किंवा पाच वर्षांच्या वयापासून सुरू केले जाऊ शकते. लहान वयातच मुलांना त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सची माहिती द्या. त्यांनी शरीराच्या नावासह प्रायव्हेट पार्ट्सची संपूर्ण माहिती द्यावी.हल्ली शाळेतच मुलांना सेक्स एज्युकेशन दिलं जातं. यामध्ये गुड-बॅड टचबद्दलही माहिती दिली जाते. अगदी पाच वर्षाखालील मुलांना देखील खाजगी भागांविषयी जागरुक केले पाहिजे. पालक आणि डॉक्टर सोडून या आपल्या खाजगी जागांना, इतर कोणालाही स्पर्श करू द्यायचा नाही असे मुलांच्या मनात रुजविले गेले पाहिजे. आजच्या डिजिटल युगात मुलांना विविध ठिकाणावरून भरपूर माहिती गोळा करता येते. ज्यापैकी काही चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकते. त्यामुळे पालंकानी मुलांशी याबाबत संवाद साधणे गरजेचे आहे. तारुण्य हे मुलांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. लैंगिक शिक्षण मुलांना त्यांच्या शरीरात होणारे बदल समजून घेण्यासाठी फायदेशीर ठरतात.