Nita Ambani यांनी तिन्ही मुलांना शिकवल्या आहेत 'या' 5 गोष्टी; तुमच्या मुलांनाही द्या ही शिकवण

Nita Ambani Parenting Tips : नीता अंबानी यांनी पालकांना दिले मोलाचे सल्ले, मुलांचं संगोपन करताना काय कराल?  

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jun 14, 2024, 06:40 PM IST
Nita Ambani यांनी तिन्ही मुलांना शिकवल्या आहेत 'या' 5 गोष्टी; तुमच्या मुलांनाही द्या ही शिकवण title=

नीता अंबानी आपल्या व्यक्तीमत्वामधून अनेक गोष्टी शिकवत असतात. एक यशस्वी उद्योजिका आणि एक खंबीर आई असलेल्या नीता अंबानी यांनी मुलांना शिकविल्यात 5 गोष्टी. अनेकदा मुलांचं संगोपन कसं करावं हे पालकांना कळत नाही. अशावेळी आपल्यापेक्षा मोठ्या लोकांचा अनुभव फायदेशीर ठरतो. गडगंज श्रीमंत असलेल्या नीता अंबानी यशस्वी उद्योजिका तर आहेतच सोबत त्या एक कर्तव्यदक्ष आई आहे. आपल्या तिन्ही मुलांना नीता अंबांनी यांनी यशाच्या शिखरावर पोहोचवलं आहे. 

शिक्षणाचं महत्त्व 

नीता अंबांनी यांनी आपल्या तिन्ही मुलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. तिन्ही मुलांच्या शिक्षणाचा पाया कसा मजबूत होईल, याकडे नीता अंबांनी यांनी विशेष लक्ष दिलं. शिक्षणासोबतच नीता अंबानी यांनी मुलांना कठीण काळात विचार कसा करावा, कठीण प्रसंग कसा हाताळावासोबतच त्या प्रसंगात खंबीर कसं राहावं याचं मार्गदर्शन केलंय. 

नैतिक मुल्य 

नीता अंबानी यांनी मुलांना नैतिक मुल्यांचं महत्त्व पटवून दिलं. माणुसकी, आदर, सन्मान यासारखी मुल्ये नीता अंबांनी यांना शिकवल्या. यामुळे मुलांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत झाली. तसेच मुलांना मेहनतीचे महत्त्व पटवून दिलं. एकमेकांचा आदर करणे यासारख्या गोष्टी शिकविल्या. 

प्रत्येक मुलं वेगळं आहे 

नीता अंबानी यांनी आपल्या तिन्ही मुलांचं वेगवेगळं अस्तित्व ओळखलं. आणि त्या तिघांनाही वेगवेगळी वागणुक दिली. तिन्ही मुलांमधील खास गुण ओळखून त्यांना त्या पद्धतीने घडवणं हा पालकांसाठी खूप मोठा टास्क असतो. यामध्ये नीता अंबानी आपल्या तिन्ही मुलांचं वेगळेपण असे जपले आहे. 

हेल्दी आरोग्य 

नीता अंबानी यांनी फक्त पालक म्हणून मुलांवर संस्कार केलेत असं नाही तर त्यांच्यासमोर एक उत्तम आदर्श उभा केला आहे. नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी वाढलेल्या वजनामुळे हैराण झाला होता. यावेळी नीता अंबानी यांनी त्याच्यासोबत वेटलॉस करुन उत्तम साथ दिली. 

मुलांसोबत क्वालिटी टाईम 

अंबानी कुटुंबिय एकमेकांसोबत अनेकदा फॅमिली टाईम घालवताना दिसतात. यामध्ये त्यांचे सणवार असोत किंवा फॅमिली फंक्शन. पण हे संपूर्ण कुटुंब कायमच गुण्या गोविंदांनी राहताना दिसतात. तसेच त्यांच्यातील संवाद कायमच मह्त्त्वाचा ठरतो. अनेकदा मुलं पालकांकडून शिकत असतात. अशावेळी पालकांनी कसे वागावे हे नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी शिकवलं.