'माझीवाली वेगळी आहे असं समजू नका,' MS Dhoni चा नात्याबाबत मोठा सल्ला; 'तो' व्हिडीओ व्हायरल

MS Dhoni Video: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी फक्त मैदानावरच नाही तर सोशल मीडियावरही चर्चेत असतो. सध्या माहीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याने रिलेशनशिपबद्दल सांगितलं आहे. नातं सांभाळताना कोणता विचार महत्त्वाचा ठरतो हे धोनी सांगत आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 29, 2023, 12:26 PM IST
'माझीवाली वेगळी आहे असं समजू नका,' MS Dhoni चा नात्याबाबत मोठा सल्ला; 'तो' व्हिडीओ व्हायरल title=

MS Dhoni Relationship : महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेटपट्टूंपैकी एक असा खेळाडू आहे जो अतिशय शांत राहून आपला खेळ दाखवत असतो. 'कॅप्टन कूल' म्हणून धोनी ओळखला जातो. मैदानावर अतिशय शांत असलेला धोनी कौटुंबिकबाबीतही तसाच आहे. धोनीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये तो रिलेशनशिपचे सल्ले देताना दिसत आहे. 

धोनीने तरुणांना अनेक टिप्स दिल्या. धोनीने काही मौल्यवान रिलेशनशिप सल्ले त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. अलीकडेच धोनी बेंगळुरू येथे एका कार्यक्रमात गेला होता, जिथे त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. हे नातेसंबंधांबद्दल होते आणि धोनीने जे सांगितले ते आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय म्हणाला धोनी

एमएस धोनी या कार्यक्रमात म्हणाला की, जर तुमचं एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम असेल तर त्या व्यक्तीचा जोडीदार म्हणून नक्की विचार करा. पण माझीवाली वेगळी आहे असा काही विचार करु नका. जोडीदारासोबतच नातं अतिशय खास असतं. या नात्यामधील गोडवा कायम टिकून ठेवायला हवा. त्यासाठी कायमच काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. ज्यामुळे जोडीदारासोबतच नातं अधिक घट्ट होतं. 

प्रेम असलेल्या व्यक्तीशी लग्न करा 

नवीन नातं निर्माण होत असताना प्रेम अतिशय महत्त्वाचं असतं. जर तुम्ही प्रेम असलेल्या व्यक्तीसोबतच तुमचं नातं घट्ट केलंत तर वैवाहिक जीवन अतिशय सुखी होतं. त्यामुळे प्रेम असलेल्या व्यक्तीसोबत आपलं नातं घट्ट करा. प्रेम असेल तर ते नातं अधिक घट्ट राहतं. प्रेमात आपण नातं जपण्याचा प्रयत्न करतो. प्रेम ही भावना तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत एकत्र राहायला शिकवते. 

प्रेम -आदर 

एकमेकांवर प्रेम करतानाच आदरही तितकाच महत्त्वाचा आहे. प्रेम आणि आदर या दोन्ही भावना तुमचं नातं अधिक घट्ट करतं. ज्या जोडीदारावर आपण इतकं मनापासून प्रेम करतो त्याचा सन्मान करणंही तितकच महत्त्वाचं आहे. आदर अतिशय महत्त्वाचा आहे. कारण नात्यामध्ये दोन व्यक्तीमत्तव एकत्र आले की, वाद होतात. पण अशावेळी आदर असणे अत्यंत गरजेचे असते. 

जोडीदावर मनापासून प्रेम करा 

आपल्या जोडीदारावर मनापासून प्रेम करा. कारण प्रेम ही एकमेव भावना आहे जी कायम तुमच्यासोबत राहणार आहे. कारण पैसा, रुप, रंग यागोष्टी बदलतील पण प्रेम हे कायमच चिरंतर राहणार आहे. नातं जसं जुनं होतं तसं प्रेम कमी होत का? असा अनेकांना प्रश्न पडतो. पण तसं अजिबातच होत नाही. वाद गैरसमज होऊ शकतात. पण अशावेळी जोडीदारावर प्रेम असणे अत्यंत गरजेचे असते.