Gudi Padwa Rangoli: हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होतो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळं हिंदू धर्मात याला विशेष महत्त्व आहे. गुढीपाडव्याला दारासमोर गुढी उभारून घरात सुख-शांती नांदू दे अशी प्रार्थना केली जाते. तर, या दिवशी दाराला आंब्याच्या पानाचे तोरण लावले जाते. घर सजवले जाते. दारासमोर रांगोळी काढली जाते. घराची शोभा वाढवण्याचे काम रांगोळी करते. त्यामुळं या दिवशी आकर्षक व सुरेश पद्धतीने दारासमोर रांगोळी काढली जाते. प्रत्येक स्त्रीला आपल्या दारासमोरील रांगोळी छान व हटके असावी अशी इच्छा असते. कारण कोणताही सण हा रांगोळीशिवाय पूर्ण होतच नाही. आज आम्ही तुमच्यासाठी खास गुढीपाडव्यानिमित्ता काढता येतील, अशा रांगोळीच्या डिझाइन्स घेऊन आलो आहोत.
हिंदू धर्मानुसार, रोज दारासमोर रांगोळी काढावी, असं सांगितले जाते. मात्र जस जसा काळ बदलला तशा काही प्रथा मागे पडत गेल्या. पण प्रत्येक शुभ प्रसंगी रांगोळी ही हमखास काढली जाते. पांढरी शुभ्र रांगोळी आणि त्यावर निरनिराळे रंग हे पाहून मन प्रसन्न वाटते. गुढी पाडव्यानिमित्त आज आम्हीही रांगोळीच्या खास डिझाइन तुम्हाला सांगणार आहोत. सोप्या व सुबक आणि महत्त्वाचे म्हणजे पाच मिनिटांत पूर्ण होतील अशा या रांगोळीच्या डिझाइन आहेत.
हल्ली घरासमोरील मोठे अंगण नाहीसे झाले आहे. शहरात फ्लॅट सिस्टिममध्ये राहणाऱ्या लोकांना दाराबाहेर छोटीशी जागा असते त्यामुळं या जागेत रांगोळी काढण्याची कला जोपासणे म्हणजे त्यांच्यासाठी आव्हानच असते. माधुरी रांगोळी आर्ट या युट्यूब चॅनलवर छोट्याश्या जागेत सुंदर व सुबक रांगोळी रेखाटण्यात आली आहे.
रांगोळीमध्येही खूप प्रकार असतात. त्यातीलच एक म्हणजे ठिपक्यांची रांगोळी सिंपल रांगोळी या युट्यूब चॅनेलवर 3*3 ठिपक्यांची सुंदर रांगोळी डिझाइन दाखवण्यात आली आहे. अगदी झटपट व छान अशी ही रांगोळी आहे. तुम्ही तुमच्या दारासमोर ही नक्की काढून पाहू शकता.
घरातील छोट्या पळीचा वापर करुन गुढीपाडव्यासाठी स्पेशल रांगोळी तुम्ही काढू शकता. कसं ते या युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता.