घरात बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचे नाव ठेवण्यासाठी आणि त्याचे नक्की नाव काय ठेवायचे यासाठी एक चर्चा नक्कीच होते. बऱ्याच घरांमध्ये गणपती बाप्पाच्या, विष्णूच्या नावावरून तर काही जणांकडे शंकरभक्त असल्यामुळे भगवान शिव वरून मराठी मुलांची नावे ठेवली जातात. भगवान शंकराची नावे अनेक आहेत. गणपतीची आणि शंकराची 108 नावे आपल्याकडे मराठी माणसांना माहीत असतात. महादेवाची नावे त्यांच्या अर्थासह अनेक बाळांची ठेवली जातात. बाळाचा जन्म झाल्यानंतर आपल्याला देवाची नावे तर हवीच असतात. गणेशाच्या नावावरून बाळांची नावे ठेवली जातात. कधी बाळासाठी दोन अक्षरी नावे, आनधुनिक नावे अथवा रॉयल नावांचाही आपल्याला शोध असतो. जर तुम्हाला तुमच्या मुलाचे नाव भगवान शिव वरून ठेवायचे असेल तर खालील नावांचे पर्याय नक्कीच मदत करतील.