How to stop Tulsi Plant from Dry Up : तुळशीचं हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. प्रत्येकाच्या घराच्या अंगणात किंवा गॅलरीत आपल्याला तुळशीचं रोप पाहायला मिळतं. तुळशीची पूजा लक्ष्मीच्या रुपात करण्यात येते. रोज सकाळी तुळशीची पूजा करण्यात येते आणि त्यासोबत जल अर्पण करण्यात येते. तुळशीला हिरवं ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. पण अनेकदा असं होतं की आपण खूप काळजी घेत असलो तरी सुद्धा बऱ्याचवेळा होतं की तुळस कोरडी होते. मग आपण त्यासाठी पाणी देणं आणखी वाढवतो इतकंच नाही तर खत देखील देतो. पण तरी सुद्धा तुळस ही कोरडीच होते. चला तर जाणून घेऊया की नक्की आपण योग्य असलेलं खत देत आहोत ना की नाही?
1. प्रत्येक घरात चहा बनवण्यात येते. कारण एक तरी व्यक्ती ही चहा प्रेमी असते. त्यामुळे दिवसात एकदा नाही तर दोन ते तीनवेळा चहा होतो. चहा पिऊन झाल्यानंतर असलेली चहापावडर ही कचऱ्यात म्हणजेच डस्टबिनमध्ये न टाकता तुळशीच्या रोपाच्या मुळांच्या इथे टाका. हा सगळ्यात चांगला ऑप्शन आहे.
2. जेवण बनवत असताना भाज्यांचे साल डस्टबिनमध्ये टाकून न देता त्याचं तुम्ही घरच्या घरी खत बनवू शकतात. त्याला कंपोस्ट खत असं म्हणतात. हे खत तुम्ही फक्त तुळशीला नाही तर इतर कोणत्याही झाडांसाठी वापरू शकतात.
3. शेण खत देखील त्याला एक खूप चांगला ऑप्शन आहे. त्याचा देखील तुम्ही यासाठी वापरू शकतो.
हेही वाचा : Fruit Diet : सलग तीन दिवस फक्त फळं खालल्यास शरीरावर काय परिणाम होतात?
4. तुळशीला फक्त एकदा खत घालून होत नाही त्यासाठी तुम्ही थोड्या थोड्या दिवसानं खत टाकत माती मिक्स करण्याचा प्रयत्न करत रहा. जर या सगळ्या खतांसोबत सेंद्रिय खत देखील तुम्ही वापरू शकतात, त्यानं तुमची तुळस कायम हिरवी राहिल.
5. तुळशीला फक्त आध्यात्मिक महत्त्व नाही, तर त्याचं आयुर्वेदित महत्त्व देखील तितकंच आहे. अनेक औषधांमध्ये तुळशीचा वापर करण्यात येतो. याशिवाय सर्दी किंवा खोकल्यावर देखील तुळशी ही फायदेकारक आहे.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)