Holi 2024 : धुलवडीनंतर हाताचा रंग निघणं कठीण होतं? अशावेळी घरगुती उपायांनी सुटेल रंग

Holi 2024 :  होळीच्या दिवशी अनेकजण अगदी मनमोकळेपणाने रंग खेळतात. मात्र खरी समस्या ही धुलिवंदन नंतर जाणवते. कपड्यांसोबतच हाताचा रंग निघणेही कठीण होतो. अशावेळी घरगुती उपाय ठरतील फायदेशीर?

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 19, 2024, 03:19 PM IST
Holi 2024 : धुलवडीनंतर हाताचा रंग निघणं कठीण होतं? अशावेळी घरगुती उपायांनी सुटेल रंग  title=

Holi Tips :  होळी आणि त्यापाठोपाठ येणारी धुलवड हा सण रंगांशिवाय अपूर्ण आहे. होळीच्या दिवसांमध्ये रंग, पाण्याने खेळायला कुणाला आवडत नाही. अगदी मनसोक्त धुळवड खेळल्यानंतर कपड्यांचे रंग कसे जाणार ही समस्या असते? अगदी त्यापद्धतीने हात आणि चेहऱ्यावरचा रंग कसा काढता येईल? ही समस्या देखील अनेकांना सतावते. 

हे रंग काढण्यासाठी अनेकजण वेगवेगळे पर्याय वापरतात. पण रंगपंचमी खेळण्या अगोदरच जर तुम्हाला याचे उपाय समजले तर नंतर त्रास होणार आहे. रंग काढण्यासाठी धुलवड खेळण्या अगोदरच काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. येथे आपण अशाच घरगुती उपायांबद्दल जाणून घेणार आहोत. यामुळे हातावरचेच नाही तर अगदी शरीराच्या कोणत्याही भागावर असलेला रंग सहज काही मिनिटांत निघून जाईल 

तेल 

सर्वात अगोदर ही गोष्ट लक्षात घ्या की, रंगाने होळी खेळण्याअगोदरच हा उपाय करायचा आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच रंगपंचमी खेळताना संपूर्ण अंगाला, हाताला आणि चेहऱ्याला तेल लावा. ज्यामुळे रंग अंगाला चिकटणार नाही आणि रंग सहज निघून जाईल. 

(हे पण वाचा - Holi Colour Removal Tips : रंगपंचमीनंतर कपड्यांचे रंग घालवण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स) 

दही आणि लिंबू

होळीचे रंग लवकर काढण्यासाठी त्वचा कोरडी नसावी. त्यात ओलावा टिकवून ठेवण्यासाठी एका भांड्यात 2 चमचे दही, 4-5 थेंब लिंबू घालून मिक्स करा. तयार मिश्रण प्रभावित भागात लावा आणि 10-15 मिनिटे सोडा. त्यानंतर ताज्या पाण्याने धुवा. दही आणि लिंबूमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असल्याने ते रंग उजळण्यास मदत करते.

तांदळाचे पीठ आणि दही यांचा वापर

तांदळाचे पीठ हे नैसर्गिक स्क्रबर मानले जाते. अशा स्थितीत मृत त्वचा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता. तांदूळ बारीक वाटून त्यात मध टाकून पेस्टप्रमाणे अंगावर घासल्याने रंग निघून जातो. रंगांशी खेळल्यानंतर आंघोळ करताना या दह्याने त्वचा स्वच्छ करा. तुमच्या त्वचेचा रंग लवकर निघून जाईल आणि त्वचेवर कोरडेपणा राहणार नाही. त्याचबरोबर दही तुमची त्वचा देखील सुधारेल.

काकडी 

रंग सोडवण्याकरता काकडीचा वापर करु शकता.  यामुळे काकडीचा रस काढून त्यामध्ये गुलाबजल आणि चमचा व्हिगेनर टाकावे. ही पेस्ट तयार केल्यानंतर हातांवर किंवा शरीराच्या इतर भागांवर लावा. यामुळे अगदी सहज रंग सुटेल. 

लिंबू आणि बेसन 

लिंबू आणि बेसनचा वापर करुन रंग काढू शकता. याकरता बेसनमध्ये लिंबूचा रस आणि दूळ मिळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट रंगाच्या भागावर लावा. अगदी काही मिनिटांत गरम पाण्याने हात धुवा.  

गवसाचे पीठ आणि बदाम तेल

गवसाचे पीठ आणि बदामाचे तेल वापरुन तुम्ही रंग काढू शकता. गवसाचे पीठ घेऊन त्यामध्ये बदामाचे तेल आणि मुल्तानी माती मिक्स करुन पेस्ट तयार करा. यानंतर ते हातांवर लावा आणि रंग अवघ्या काही मिनिटांत निघेल.