Gain Self Respect : दुसऱ्यासोबत तुलना करणं करा बंद, अशी वाढवा स्वतःची किंमत

Gain Self Respect : समोरच्या व्यक्तीमधील सगळ्या गोष्टी भारी आहेत, मग आपल्याला तसं का जमत नाही? या प्रश्नाने बेजार झाला असाल. तर पहिला हा विचार थांबवा. स्वतःची किंमत वाढवण्यासाठी काही टिप्स.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 9, 2024, 12:11 PM IST
Gain Self Respect : दुसऱ्यासोबत तुलना करणं करा बंद, अशी वाढवा स्वतःची किंमत  title=

तुलना करणे हा मानवी स्वभाव आहे. यामध्ये आपण लहान मुलांपासून स्वतःच्या वयापर्यंतच्या सगळ्याच व्यक्तींची तुलना करत असतो. तुलना करणे म्हणजे एक प्रकारे स्वतःला त्रास करुन घेणे असा होतो. आपल्याकडे काय आहे त्याकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याकडे काय आहे याकडे बघण्याचा माणसाचा कल असतो. यामुळे पदरी फक्त दुःख आणि निराशाच निर्माण होते. एवढंच नव्हे तर या सगळ्यामुळे स्वतःचा आत्मविश्वास आणि समाजामध्ये स्वतःची किंमत कमी करुन घेतली जाते. 

या सर्व गोष्टींमध्ये आपण स्वतःची इतरांशी तुलना करतो का? स्वतःची इतरांशी तुलना करण्यापासून स्वतःला रोखतो का? याचा देखील विचार करायला हवा. आजकाल प्रत्येकाला परिपूर्ण व्हायचे आहे. इतरांशी स्वतःची तुलना करणे खूप सामान्य आहे आणि त्यांचा हेवा वाटणे देखील सामान्य आहे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या क्षमतांचा विचार न करता फक्त तुमच्या उणिवांची काळजी करता तेव्हा तुम्ही चुकीच्या मार्गावर जात आहात. जर आपण आपले कर्तृत्व आणि क्षमता तपासू लागलो तर आपण खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकतो.

तुमच्याकडे जे आहे त्यासाठी कृतज्ञता

जर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टींचे कौतुक करत असाल आणि त्याबद्दल आनंदी असाल तर तुम्ही तुमचे लक्ष इतर लोकांकडून स्वतःकडे वळवू शकाल. तुमच्या सभोवतालच्या काही सकारात्मक आणि चांगल्या गोष्टींचा विचार करून तुमचा बहुतांश वेळ घालवा. तुमचे लक्ष इतर लोकांकडून स्वतःकडे सरकत आहे असे तुम्हाला स्वतःला वाटू लागेल.

जीवनातील आनंदाच्या क्षणाची नोंद करा

तुमच्याकडे काय आहे याची आठवण करून देण्यासाठी तुम्ही पूर्ण केलेल्या गोष्टींची यादी बनवणे हा एक चांगला मार्ग आहे. तसेच या सगळ्यासाठी Gratitude Dairy लिहिणे ही एक चांगली सवय आहे.  हे आपल्याला बऱ्याच काळापासून विसरलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करेल. आता तुम्ही याचेही कौतुक करू शकाल. तुमच्या काही सर्वोत्तम आठवणींचा विचार करा.

कठोर होऊ नका

जर तुम्ही स्वतःबद्दल दयाळू आणि कमी निष्ठुर होणे अपेक्षित आहे. अनेकदा अशा प्रकरणात स्वतःवर रागवू नका. या दिवसांमध्ये स्वतःला सतत सकारात्मक ठेवण्याची गरज आहे. जगापासून संपर्क तोडण्यापेक्षा स्वतःला चांगल्या लोकांच्या संगतीत ठेवा. स्वतःला त्रास देऊ नका. 

निर्णय स्वतःचे स्वतः घ्या

स्वतःची इतरांशी तुलना करण्यापासून स्वतःला रोखणे कठीण आहे. तुम्हाला तुमचे आयुष्य कोणत्या दिशेने न्यायचे आहे हे फक्त तुम्हीच ठरवा. तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व निर्णय घेता आणि हे सर्व तुम्ही स्वतःसाठी करता आणि इतर कोणासाठी नाही. इतर लोकांकडे काय आहे किंवा नाही हे महत्त्वाचे नाही. तुमच्या जीवनात जर काही महत्त्वाचे असेल तर ते तुम्ही आहात.