Tricks to pick a ripe sweet watermelon : उन्हाळा सुरु झाला असून अशात आपण शरिराला थंड ठेवण्यासाठी जे काही सेवन करता येईल त्या पदार्थांचे सेवन करण्याचा प्रयत्न करतो. तर सगळ्यात जास्त मागणी ही कलिंगडाची असते. आपल्या शरिरातील पाण्याची कमी कलिंगड भरुन काढतं असं म्हणता येईल. अनेक प्रकारचे पोषक घटक असणाऱ्या कलिंगडाचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. पण तुम्हाला देखील कलिंगड खरेदी करायला जाताना प्रश्न पडतो का की ते आतुन चांगलं असेल ना की कोरडं असेल?
कलिंगड घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा ते आतुनं कसं आहे हे ओळखण्याची एक योग्य पद्धत आहे. आज आपण त्याविषयी जाणून घेऊया... कधीही कलिंगड खरेदी करत असताना त्याचा आकार हा एकसारखा आहे ना हे पाहा. याचाच अर्थ ते कलिंगड कोणत्याही एका बाजून खोलगट किंवा ओबडधोबड असलं की त्याची वाढ ही चांगल्या प्रकारे झाली नाही असा होतो. त्यानंतर कलिंगडाचा बाहेरु रंग हा चमकदार आहे का तू गुळगुळीत आहे का हे एकदा हात लावून तपासा. ज्या कलिंगडाचा रंग हा गडद हिरवा आणि त्याच्यावर असणाऱ्या पिवळ्या रंगाचा रेघा या गडद असतील तर ते चांगलं आहे.
कलिंगड खरेदी करताना ते कुठे तरी मऊ असेल किंवा कुठे डाग असतील मग ते खरेदी करु नका.
कलिंगड निवडण्याची योग्य पद्धत अशी आहे की तुमच्या बोटाच्या पेरानं कलिंगडावर टॅप करा त्यावेळी जर दणकट असा असेल तर ते चांगलं आहे. हे कलिंगड नक्कीच तुम्हाला गोड आणि रसाळ असं कलिंगडाचा आनंद मिळून देईल. जर एखाद कलिंगड हे चांगलं नसेल तर त्यातून असा आवाज येणार नाही.
हेही वाचा : 'माझ्या मुलीनं उगीच कंबर का हलवावी?’ …म्हणून संजय दत्त मुलीला बॉलिवूडमध्ये येऊ देत नाही!
जे कलिंगड हे पिकलेलं आहे त्याचं वजन हे त्याच्या आकारापेक्षा जास्त असतं. त्यामुळे त्यात पाण्याची मात्रा जास्त आणि ते गोड आहे हे दर्शवतं. त्यासाठी तुम्हाला पसंत असलेलं कलिंगड हातात घेऊन दुसऱ्या हातात दुसरं कलिंगड घेऊन त्यांच्यातील वजनाची तुलना करा. ज्या कलिंगडाचं वजन जास्त आहे ते नक्कीच गोड आणि चविष्ट निघेल. तर कलिंगडाचं टोक म्हणजेच जिथे त्याचं मूळ दिसतं तो भाग पिवळा किंवा गोल्डन आहे का ते तपासा तसं असेल तर कलिंगड हे पिकल्यानंतर त्याला शेतातून आणल्याचं दर्शवतं.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)