food items our kitchen contains poison: निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारात पोषक घटक असणे आवश्यक आहे. परंतु बदलत्या जीवनशैलीत आपल्या खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोषक घटक कमी होत आहेत. इच्छा नसताना आपण फास्ट फूड, चायनीज आणि प्रोसेस्ड फूड खातो. हे सर्व खाद्यपदार्थ बनवण्यासाठी गोड, साखर, मैदा, अजिनोमोटो, तांदूळ आणि बटाटा यांसारख्या कच्च्या मालाचा सर्वाधिक वापर केला जातो. यामध्ये विशेषतः प्रक्रिया केलेले अन्न किंवा कोणतेही प्रक्रिया केलेले अन्न अत्यंत धोकादायक आहे. त्यांच्या अतिसेवनामुळे कर्करोग, टाईप-2 मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका, रक्तदाब इत्यादी रोग तर होतातच पण त्या व्यक्तीचे वय किमान 10 वर्षांनी कमी होते.
- बदाम आरोग्यासाठी उत्तम समजले जाते. मात्र स्वयंपाक घरात ठेवलेले बदाम जुने झाल्यानंतर थोडे कडवटपणा येतो. जुने झालेले बदाम आरोग्यासाठी विषसमान असतात.
- बटाट्याचा वापर अनेक भाज्यांमध्ये केला जातो. मात्र बटाटेदेखील बरेच दिवस ठेवल्याने त्यांना मोड येतात, यामध्ये विष निर्माण होते.
- मध बऱ्याच जणांना खाणे पसंत असते. मात्र हे मध आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. कारण यामध्ये छोटे-छोटे जीवजंतू असतात. त्यामुळे मधमाशांच्या पोळ्यातीस मधाचे सेवन केल्यास उलट्यांचा त्रास आणि चक्कर येऊ शकते.
- सफरंद आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्र सफरचंदाच्या बियामध्ये प्लम सारख्या फळांच्या बीमध्ये हायड्रोजन सायनाईडचे प्रमाण अधिक असते. यामध्ये प्रोसियिक अॅसिड असते. मात्र चुकूनही या फळांच्या बियांचे सेवन करु नये, कारण आरोग्यासंबंधीत गंभीर तक्रारी निर्माण होऊ शकतात.
- जायफळ हे औषधी गुणांनी युक्त असते. मात्र आवश्यक मात्रेहून अधिक सेवन केल्यास आरोग्यास हानिकारक ठरु शकते. अधिक प्रमाणात जायफळ खाल्ल्याने ह्रदयविकार, कमकुवतपणा यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतो.
- पांढरा ब्रेड, केक, बिस्किटे आणि पेस्ट्री सारख्या पांढऱ्या पिठापासून बनवलेल्या सर्व पदार्थांचा समावेश आहे. गव्हापासून पीठ बनवण्याच्या प्रक्रियेत, त्यात असलेले जवळजवळ सर्व पोषक घटक नष्ट होतात. यामुळे इन्सुलिन प्रतिरोध आणि गर्भधारणेदरम्यान टाइप 2 मधुमेहाचा धोका देखील होतो.
- पांढऱ्या तांदळाचा वापर टाईप-2 मधुमेह वाढण्याशी संबंधित आहे. जे तांदळाशिवाय राहू शकत नाहीत त्यांच्यासाठ तपकिरी किंवा लाल तांदळाचा पर्याय उत्तम आहे.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)