मान काळी पडलीये, नारळाच्या तेलात मिसळून 'हा' एक पदार्थ लावा, लगेच होईल स्वच्छ

Home Remedies To Clean Dark Neck: काळी मान स्वच्छ करण्यासाठी तुम्ही पार्लरमध्ये जाऊन भरपुर पैसे खर्च करुन ट्रिटमेंट करुन घेता. पण त्याऐवजी या पदार्थामुळं लगेचच स्वच्छ होईल काळी मान  

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 22, 2023, 04:02 PM IST
मान काळी पडलीये, नारळाच्या तेलात मिसळून 'हा' एक पदार्थ लावा, लगेच होईल स्वच्छ title=
Get Rid of a Dark Neck using these Home Remedies and coconut oil

Dark Neck Remedy: उन्हाळ्यामुळं किंवा प्रदूषणामुळं चेहरा काळवंडतो किंवा कधी कधी चेहऱ्यावर डाग येतात. यामुळं सौंदर्यात बाधा निर्माण होऊ शकते. चेहऱ्याच्या सौंदर्यांची काळजी प्रत्येकजण घेतोच. उन्हामुळं मानदेखील काळवंडते. पण मानेकडे सहसा लवकर लक्ष जात नाही. कधी कधी मानेवर मळ साचून राहिल्यामुळं व आंघोळ करताना नीट स्वच्छता न केल्यास मान काळी पडते. खरं तर मान काळी पडण्याची अनेक कारणे आहेत. कधी कधी काळी पडलेल्या मानेमुळंही सौंदर्य कमी होते. अशावेळी घरातीलच साहित्य वापरुन तुम्ही मानेचा रंग पुन्हा उजळू शकता. 

मान काळी होण्याची कारणे!

मानेवर मळ साचल्याने, केस सतत खुले ठेवल्याने, मानेवर हायपरपिग्मेंटेशन झाल्यास, मानेवर टॅनिंग झाल्यास (Tanning) किंवा कधी कधी हार्मोनल कंडिशनमुळंही मान काळी होऊ शकते. अशावेळी घरगुती उपायांनी हा काळेपणा दूर केला जाऊ शकतो. हे उपाय खूपच सोप्पे असल्याने तुम्हाला जास्त मेहनत आणि वेळही वाया घालवावा लागत नाही. 

काळी मान स्वच्छ करण्याचे घरगुती उपाय (Home Remedies To Clean Dark Neck)

नारळ तेलाच्या मदतीने मानेचा काळेपणा कमी करु शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त त्यात एक पदार्थ मिसळून मानेवर लावा. एका वाटीत नारळाचे तेल आणि लिंबाचा रस टाकून हे मिश्रण तयार करा. त्यानंतर आता हे मिश्रण 10 मिनिटे मानेवर लावून ठेवा. काही वेळाने मान स्वच्छ धुवून घ्या. दररोज हे मिश्रण मानेला लावल्यास हळहळू काळपट पणा दूर होईल. 

तुम्हाला लिंबाचा वापर नसेल करायचा तर तुम्ही नारळाच्या तेलाच कोरफडचे जेल वापरु शकता. ही पेस्ट तुम्ही रात्रभर मानेवर लावून ठेवू शकता. 

हे घरगुती उपायही फायदेशीर 

काळपट मान स्वच्छ करण्यासाठी बटाट्याचा रसही खूप फायदेशीर आहे. बटाट्याच्या रसात लिंबाचा रस पिळून हे मिश्रण मानेवर लावा. किंवा फक्त बटाट्याचा रसदेखील लावू शकता. कापसाच्या सहाय्याने मानेवर तुम्ही हे मिश्रण लावू शकता त्यानंतर मान धुवून घ्या. आठवठ्यातून 3 ते 4 वेळा याचा वापर केल्यास काळी मान स्वच्छ होईल. 

काळी मान स्वच्छ करण्यासाठी तुम्ही उटण्याचाही वापर करु शकता. हे उटणं बनवण्यासाठी तुम्ही बेसन, अर्धा चमचा लिंबू, हळद आणि दूध किंवा गुलाबपाणी टाकून पेस्ट बनवून घ्या. आता हे मिश्रण 15 मिनिटे मानेवर लावा आणि नंतर थोड्यावेळाने धुवून घ्या. आठवड्यातून दोनवेळा हे उटणं लावून घ्या यामुळं मान उजळेल. 

बेकिंग सोडादेखील तुम्ही काळी मान स्वच्छ करण्यासाठी वापरु शकता. एक चमचा बेकिंग सोडा घेवून त्यात पाणी मिसळा आणि आता ही पेस्ट 10 मिनिटे मानेवर लावा. त्यानंतर मान ओल्या कपड्याने साफ करुन घ्या. बेकिंग सोडा मानेवरील मळ आणि डेड सेल हटवतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)